प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा - सिंधुदुर्ग
नवप्रभात NEWS/वेंगुर्ले
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र शासनाच्या वतीने बुधवार दिनांक १३/०३/२०२४ रोजी वेंगुर्ले तालुक्यातील बांधकाम कामगार बांधवांना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांच्या उपस्थितीत गृहपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , शक्तिकेंद्र प्रमुख विजय बागकर , निवृत्त कामगार अधिकारी किरण कुबल , संगणक ऑपरेटर प्रविण जाधव व स्वाती अणावकर , किट वाटप मदतनीस अमित कुबल व विष्णु रेडकर , पुजा बागकर इत्यादी उपस्थित होते .
यावेळी बांधकाम कामगारांना मार्गदर्शन करताना प्रसंन्ना देसाई म्हणाले कि विकसित भारताच्या उभारणीच्या आकांक्षा पुर्ण करण्यात श्रमशक्तीचा मोठा वाटा आहे . या संकल्पनेतून नव्या भारतात कामगार आणि कष्टकऱ्यांचा आदर करण्याची संस्कृती उदयास येत आहे . देशाला आता आपल्या श्रमशक्तीचा अभिमान आहे .
कष्टाचा आदर आणि कष्टकऱ्यांचा सन्मान हे मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे .पंडित दीनदयाळ उपाध्याय " श्रमेव जयते " च्या माध्यमातून मोदी सरकार कामगारांचे सक्षमीकरण करुन त्यांच्यासाठी सर्वसामावेश संरक्षणाची हमी देत आहे .
यावेळी भाजप कामगार मोर्चाचे कार्यकर्ते तसेच शेकडो लाभार्थी उपस्थित होते.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments