शुक्रवार दिनांक १ मार्च रोजी दुपारी ३ - ०० वाजता कुडाळ मधील महालक्ष्मी हाॅल मध्ये शक्तीवंदन कार्यक्रम
नवप्रभात NEWS / कुडाळ
भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री व शक्तीवंदन अभियान प्रमुख मा.तरुण चुग , राष्ट्रीय सचिव व शक्तीवंदन अभियान सह प्रमुख मा.विजयाताई रहाटकर यांच्या मार्गदर्शनात " शक्तीवंदन अभियान " संपुर्ण देशभर राबविले जात आहे . हे अभियान जिल्हा , तालुका व गावपातळीवर न्यायचे आहे . या अभियानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांची अभियान प्रमुख म्हणून जबाबदारी दिली असून , महीला जिल्हाध्यक्षा सौ.श्वेता कोरगावकर यांच्या सहीत १५ जणांची " शक्तीवंदन कमिटी " तयार केली असून , प्रत्येक मंडल निहाय २५ जणांची " शक्तीसंगीनी " कमीटी तयार केली आहे .या अभियानात CRP , NGO व बचत गटातील महीलांचे मेळावे घेण्यात येणार आहेत .
महीला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या १ मार्च च्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या अनुशंगाने भाजपा कुडाळ तालुका कार्यालयात नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती . या बैठकीत महीला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर , अभियान संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , प्रदेश सदस्य संध्याताई तेरसे , महीला प्रदेश सदस्या दिप्ती पडते , जि.का.का.सदस्य आदिती सावंत , जिल्हा उपाध्यक्षा मिसबा शेख , कुडाळ मंडल अध्यक्षा आरती पाटील , मंडल सरचिटणीस रेवती राणे , कुडाळ शहर अध्यक्षा मुक्ती परब , शहर उपाध्यक्षा तेजस्वीनी वैद्य , शहर सरचिटणीस अक्षता कुडाळकर व रीना पडते , शहर उपाध्यक्षा विशाखा कुलकर्णी तसेच भाजपा ओरस मंडल अध्यक्ष दादा साईल उपस्थित होते .
यावेळी शक्तीवंदन कार्यक्रमाचे नियोजन करून जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या १५ महिलांचा सन्मान प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे . तसेच या कार्यक्रमास जिल्ह्यातुन जास्तीत जास्त महीलांनी उपस्थित रहावे , असे आवाहन महीला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी केले आहे .
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments