Type Here to Get Search Results !

नोंदीत बांधकाम कामगारांना निवडणूक आचारसंहीता लागण्यापुर्वी गृहोपयोगी भांड्यांचे वाटप करा

नोंदीत बांधकाम कामगारांना निवडणूक आचारसंहीता लागण्यापुर्वी गृहोपयोगी भांड्यांचे वाटप करा

नवप्रभात NEWS / ओरोस 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना निवडणूक आचारसंहीता लागण्यापुर्वी गृहोपयोगी भांड्यांचे वाटप करा , भाजपा कामगार मोर्चाची सरकारी कामगार अधिकाऱ्यांकडे मागणी

   भाजपा कामगार मोर्चा , सिंधुदुर्ग च्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्तांची भेट घेऊन , निवडणूक आचारसंहिता कालखंड सुरु होण्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना ३० गृहोपयोगी भांड्यांच्या संचाचे वाटप करावे , अशी मागणी कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली .
    महाराष्ट्रातील भाजपा महायुती सरकारच्या नवीन धोरणानुसार सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ३० गृहोपयोगी भांड्यांचा संच देण्यात येणार आहे . त्यामुळे कामगार वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे . ह्या गृहोपयोगी वस्तु लोकसभा निवडणूक आचारसंहितेपुर्वी देणे आवश्यक आहे . त्यासाठी लवकरात लवकर याची कार्यवाही व्हावी अशी मागणी कामगार अधिकारी यांचे कडे केली .
 तसेच लवकरच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नोंदणीकृत कामगारांचा मेळावा आयोजित करुन , त्यांच्याच उपस्थितीत गृहोपयोगी भांड्यांचे वाटप कार्यक्रम करणार असल्याचे भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांनी सांगितले .
   यावेळी कामगार मोर्चाचे कोकण विभाग अध्यक्ष लिलाधर भडकमकर , लोकसभा मतदारसंघ संयोजक उदय गोवळकर , सावंतवाडी विधानसभा संयोजक सत्यम नारायण सावंत , कोकण विभाग का. का. सदस्य आबा पोखरणकर , सावंतवाडी मंडल अध्यक्ष विनोद सावंत , बांदा मंडल संयोजक संजय सावंत इत्यादी उपस्थित होते .

🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments