Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले नगरपरिषदेमार्फत मतदान जनजागृतीपर पथनाट्य सादर

वेंगुर्ले नगरपरिषदेमार्फत मतदान जनजागृतीपर पथनाट्य सादर

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

मतदान हा लोकशाहीचा आधास्तंभ आहे, मतदान करणे हा नागरीकांचा मुलभूत अधिकार आणि जबाबदारी आहे. त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी योगदान देण्यासाठी एक शक्तिशाली साधन प्रदान करते या नागरी कर्तव्याची प्रभावी अंमलबजावणी होणेसाठी  वेंगुर्ला नगरपरिषद व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला शहरातील नागरिकांसाठी दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी 'मतदान जनजागृती पथनाट्य' आयोजित करण्यात आले. हे पथनाट्य शहरातील वर्दळीच्या ठिकाणी म्हणजेच मार्केट परिसर तसेच दाभोली नाका येथे सादर करण्यात आले. या पथनाट्याला नागरिकांनी उतस्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व नगरपरिषदेच्या प्रशासकिय अधिकारी सौ. संगीता कुबल तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पथनाट्याद्वारे नवीन मतदार नोंदणी प्रक्रिया, नागरिक मतदान हक्क, मतदान केल्याने समाजातील सकारात्मक बदल आणि परिवर्तन, मतदानाची गरज तसेच EVM मशीन व VVPAT याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.


🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments