Type Here to Get Search Results !

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून मंजुर झालेल्या संरक्षक भिंतीचे राजन तेलींच्या हस्ते भूमिपूजन

केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून मंजुर झालेल्या संरक्षक भिंतीचे राजन तेलींच्या हस्ते भूमिपूजन
 
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

   केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील वेंगुर्ला वडखोल कॅम्प रस्त्यावर श्री. रमाकांत केरकर यांच्या घराजवळ संरक्षक भिंत बांधणे. ता. वेंगुर्ला या कामाचा शुभारंभ  सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेलीसाहेब यांच्या हस्ते  करण्यात आला .
         यावेळी भूमिपूजन प्रसंगी वडखोल वासीयांशी संवाद साधताना मा.आम. राजन तेली म्हणाले की वेंगुर्ले शहराचा विकास हा भाजपाच्या माध्यमातून झाला . भाजपाचा नगराध्यक्ष वेंगुर्लेत विराजमान झाल्यावर तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून रविंद्रजी चव्हाण यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी वेंगुर्ले नगरपरिषदेस दिल्यामुळेच वेंगुर्ले शहराचा सर्वांगीण विकास झाला .
    यावेळी सर्वप्रथम भाजपा ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर यांनी मा.आम.राजन तेली यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , किसान मोर्चाचे प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु , मा.उपनगराध्यक्ष दाजी परब , जेष्ठ नेते सोमनाथ टोमके ,  युवा मोर्चाचे भुषण आंगचेकर व प्रणव वायंगणकर , ता.चिटणीस जयंत मोंडकर , बुथ प्रमुख पुंडलिक हळदणकर ,श्याम केरकर, रमाकांत केरकर , शेखर पालयेकर, हेमंत तुळसकर , निकेश पवार , अविनाश केरकर, मक्तेदार गावडे इत्यादी उपस्थित होते .

       🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments