महिलांसाठी ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धा
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर-मेस्त्री सांस्कृतिक मंच दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त महिलांसाठी ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन केले आहे.
ऑनलाईन अभिनय स्पर्धा ही शालेय (१ ली ते १० वी पर्यंत शालेय मुली) आणि खुला अशा दोन गटात महिलांसाठी होणार असून कोणत्याही सामाजिक ज्वलंत विषयावरती किमान ३ मिनिटे ते कमाल ४ मिनिटे चा व्हिडिओ मोबाईलवर तयार करून तो ९४२१२३८०५३ या व्हॉट्स अॅप क्रमांकावर ५ मार्च पूर्व पाठवायचा आहे. ऑनलाईन स्पर्धेसाठी स्पर्धकांनी रंगभूषा किवा वेशभूषा करण्याची आवश्यकता नाही. व्हिडिओ एडिट केलेला नसावा. स्पर्धकांनी व्हिडिओ चित्रित करताना स्वतः चे पूर्ण नाव, स्पर्धा गट, गाव, संफ क्रमांक, अभिनय विषय त्यांनतर मुख्य अभिनय असा सादरीकरणाचा क्रम ठेवायचा आहे. तसेच रेकॉर्डिंग करताना इतर आवाज येणार नाही याची दक्षता घ्यावी. शालेय विद्यार्थ्यांनी व्हिडिओशिवाय शाळा शिफारस पत्र किवा ओळखपत्र पाठवणे बंधनकारक आहे. दोन्ही गटातील स्पर्धेतील विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ७००, ५५०, ४०० आणि उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी २५० तसेच चषक देऊन गौरविण्यात येईल.
स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी पा.डॉ.सचिन परुळकर (९४२१२३८०५३) यांच्याशी संफ साधावा. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर आणि आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर-मेस्त्री यांनी केले आहे.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments