Type Here to Get Search Results !

कणकवली भिरवंडे रामेश्वर मंदिरात उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह

कणकवली भिरवंडे रामेश्वर मंदिरात उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह

कणकवली/प्रतिनिधी

सिंधुदुर्गातील जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या भिरवंडे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात शुक्रवार 16 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा होणार आहे.
 शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी माघ शु. रथसप्तमीच्या शुभमुहुर्तावर अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने 8 दिवस संपूर्ण भिरवंडे गाव भक्तीरसात न्हाऊन निघणार आहे. 
कणकवली तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या भिरवंडे गावाला ऐतिहसिक, राजकीय, सामाजिक परंपरा लाभली आहे. या गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर हे सिंधुदुर्गातील प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखले जाते. हरिनाम सप्ताहासाठी संपूर्ण भिरवंडे गाव सज्ज झाला आहे. सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मंदिर सजावटीसह आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या उत्सवासाठी मुंबईकर चाकरमानी मंडळीही मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. शुक्रवारी दुपारी 2 वा. ढोलताशांच्या गजरात घटस्थापना करून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर 8 दिवस हरिनामाच्या गजरात अवघा भिरवंडे गाव दंग होणार आहे. 
सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील नामवंत भजनी बुवांची भजने, दिंड्या तसेच ऐतिहासिक, सामाजिक, पौराणिक विषयांवरील चित्ररथ सादर होणार आहेत. त्याचबरोबर दुसर्‍या रात्रीपासून श्री देव रामेश्वराची पालखी प्रदक्षिणा हे या सप्ताहाचे खास वैशिष्ट्य आहे. ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत हरिनामाचा गजर करत निघणार्‍या या पालखी प्रदक्षिणेत सर्वजण भक्तीभावाने सहभागी होतात. सप्ताह कालावधीत 8 दिवस जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक भक्तगण या उत्सवासाठी येवून श्री देव रामेश्वराचे दर्शन आणि दुपारी महाप्रसादाचा लाभ घेतात. तरी शुक्रवारपासून साजरा होणार्‍या हरिनाम सप्ताहाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवालये संचालक मंडळ व भिरवंडे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.  
सप्ताहानिमित्त शनिवार 17 फेब्रुवारी दु. 1 वा. बुवा शशिकांत राणे ( भालचंद्र बाबा प्रा.भजन मंडळ, कणकवली) रात्री 9 वा. बुवा-प्रथमेश मोरये यांचे भजनाचे कार्यक्रम होणार आहेत.

 
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका पातळीवर प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments