कणकवली/प्रतिनिधी
जिल्ह्यात शाश्वत स्वच्छता राहावी व लोकांच्या आरोग्यात सुधारणा होऊन गावे आणि शहरे आरोग्य संपन्न व्हावी. याच उद्देशाने कणकवली पंचायत समिती येथील परीसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याचे प्रतिपादन माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांनी केले.
माऊली मित्र मंडळ आणि जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ यांच्या वतीने आज कणकवली पंचायत समिती येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी पेडणेकर बोलत होते.
यावेळी अविनाश गावडे ,प्रसाद उगवेकर, सी.आर .चव्हाण , महानंद चव्हाण,प्रभाकर कदम, सईद नाईक, प्रसाद पाताडे, भगवान कासले, बाबू घाडीगांवकर,भाई साटम, बाबी फाटक ,सतीश राठोड, सुभाष उबाळे, निलेश निखार्गे आदी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वखुषीने स्वच्छता दूत म्हणून काम करणाऱ्या या सर्व लोकांनी कणकवली पंचायत समितीच्या परीसरात साफसफाई करून स्वच्छतेची शहर-धून निर्माण केली आणि आरोग्यसंपन्न आणि सुदृढ आरोग्याचा पाया रोवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
स्मार्ट सिटी च्या दिशेने पावले टाकताना, विविध उपक्रमांबरोबरच स्वच्छतेला देखील तितकेच महत्व दिले गेले पाहिजे. आणि हे साध्य करण्यासाठी माऊली मित्र मंडळ कुठेही कमी पडणार नाही’ असेही पेडणेकर यावेळी म्हणाले.
माऊली मित्र मंडळ आणि जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळाची स्वच्छता मोहीम सर्वंच स्तरावरील लोकांना प्रेरणादायी आहे.मंडळाचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.स्वछतेचा हा उपक्रम स्तुत्य आहे.अशा शब्दात माऊली मित्र मंडळ आणि जूना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळाचे कौतुक यावेळी करण्यात आले.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका पातळीवर प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments