Type Here to Get Search Results !

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा किसान मोर्चाच्या ग्राम परिक्रमा यात्रा कार्यक्रमाच्या नियोजनाची सभा भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथे झाली संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा किसान मोर्चाच्या ग्राम परिक्रमा यात्रा कार्यक्रमाच्या नियोजनाची सभा भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथे झाली संपन्न

नवप्रभात NEWS / ओरोस 

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा किसान मोर्चाच्या ग्राम परिक्रमा यात्रा कार्यक्रमाच्या नियोजनाची सभा भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथील वसंत स्मृती कार्यालयात नुकतीच संपन्न झाली. यावेळी घर चलो अभियान, गाव चलो अभियान याप्रमाणेच ग्राम परिक्रमा यात्रा असून यात्रेचा शुभारंभ गोमातेचे पूजन करुन आणि स्थानिक शहिदांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात येईल त्यानंतर गावातील शेतक-यांची बैठक घेतली जाईल त्यात त्यांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या केंद्रीत योजनेची माहिती दिली जाईल व घरोघरी फिरून शेतकऱ्यांशी संपर्क केला जाईल असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले.त्याचप्रमाणे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *ग्राम परिक्रमा यात्रा* कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले सदर यात्रा १४ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत होणार आहे.यावेळी भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा किसान मोर्चा प्रभारी प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई , किसान मोर्चा प्रदेश सदस्य बाळू प्रभू , किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस महेश संसारे, सोशल मीडिया संयोजक विजय रेडकर, सरचिटणीस अजय सावंत, प्रसाद भोजने, ज्योती देसाई,आनंद गावडे , संदिप देसाई, रेखा खाडये, दिपा काळे, सॅम्युएल काळे, महादेव सावंत, वैभव शेणई, प्रकाश पांचाळ, अवधूत नारकर, महेश सारंग (मालवण), किशोर नरे, शंकर तेजम आदी पदाधिकारी उपस्थित होते .


🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS 
 
     बातम्यां आणि फोटोसाठी    
           व्हाट्सअप नंबर
           9552296922       
   
          📝📝📝📝

🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व   
          गोव्यातील बातम्या
             एकाच ठिकाणी 
                                          
                🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️ विविध जाहिरातींसाठी  
            'नवप्रभात पब्लिसिटी'      
                9552296922

Post a Comment

0 Comments