नवप्रभात NEWS / वेगुर्ला
शिव जयंतीचे औचित्य साधून आरवली मित्र मंडळ टाक आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल ची इयत्ता आठवी ची विद्यार्थिनी कु. निधी यशवंत पेडणेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.
तर नेमळे पंचक्रोशी विद्यालयात संपन्न झालेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ घेण्यात आलेल्या जिल्ह्यास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अमृता दत्ताराम नवार हिने प्रथम क्रमांक मिळविला
तर गुरू माऊली ग्रंथ संग्रहालय वजराठ, वेंगुर्ला आयोजित स्पर्धा
जागतिक हस्ताक्षर दिना निमित्त आयोजित स्पर्धेत गायत्री लक्ष्मण वरगावकर हिने तृतीय क्रमांक मिळविला.
या विविध ठिकाणी झालेल्या विविध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा प्रशालेने आपली यशाची पंरपरा अबाधित राखली.
या सर्व स्पर्धकांना प्रशालेचे उपक्रमशील अध्यापक वैभव खानोलकर आणि लिपिक अजित केरकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या हस्ताक्षर , चित्रकला, वक्तृत्व या तिन्ही स्पर्धेतही उल्लेखनीय यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा हायस्कूलचे मुख्याध्यापक
उमेश वाळवेकर , संस्था अध्यक्ष विरेंद्र आडारकर कामत, सचिव तथा जेष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले, उपाध्यक्ष रमेश पिगुळकर,निलेश मांजरेकर आणि सर्व पदाधिकारी यांनी या यशस्वी विद्यार्थी तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षक आणि लिपिक श्री अजित केरकर
यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे हि विशेष अभिनंदन केले
विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करून जिल्हा स्तरावर यश पटकावणाऱ्या या न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा प्रशालेचे सर्वत्र कौतुक होत आहे
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments