वेंगुर्ले येथे कातकरी समाजाला शासनातर्फे घर उभारणीसाठी भूखंड मंजूर
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
वेंगुर्ला शहरातील कॅम्प येथे २५ ते ३० वर्षे वास्तव्यास असलेल्या कातकरी समाजाला शासनातर्फे मौजे वेंगुर्ला सरकारी कॅम्प स.नं. ४९१ हि.नं.१ ब क्षेत्र ४८.६१.०१५ हे आर या शासकीय जमिनीपैकी कातकरी कुटुंबासाठी (भूखंड १ ते ३०) नूसार प्रत्येकी ५० चौ.मी. याप्रमाणे ००.१४.५० हे आर क्षेत्र व अंतर्गत रस्त्यासाठी क्षेत्र ०.०३.५० असे एकूण ००.१८.०० हे आर क्षेत्र मंजूर करण्यात आलेले असून या ठिकाणी एकूण २९ कुटुंबे वास्तव्यास आहेत. या कुटुंबांसाठी PM JANMAN अन्वये वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत नळपाणी योजनेअंतर्गत कातकरी वस्तीमध्ये २००० लीटर क्षमतेची टाकी बसवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली तसेच सामुदायिक शौचालयाची सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देण्यात आली.
त्याचप्रमाणे वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीमधील सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात घरकुलापासून वंचित असलेल्या अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांची पडताळणी करुन पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करुन शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण रायगड यांचे कार्यालयात प्रती लाभार्थी २.५० लक्ष एवढा निधीची मागणी करण्यात आलेली असून निधी प्राप्त झालेनंतर त्यांच्या घरकुलाचा प्रश्न निकाली लागणारा आहे.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण राज्यात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments