ग्रामीण भागातील युवकांची मानसिकता बदलणं गरजेचं -प्रा.खानोलकर
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक विद्यार्थी कल्याण विभाग, बहिःशाल शिक्षण मंडळ आयोजित व्याख्यानमालेत
ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी युवकांनी पुढे येणे गरजेचे असुन त्यासाठी गावाकडे बघण्याची मानसिकता बदलणं गरजेचं आहे असे मत या वेळी युवा व्याख्याते प्रा.खानोलकर यांनी व्यक्त केले
कोकण एज्युकेशन सोसायटीचे लोकनेते ॲड दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने बहिःशाल शिक्षण मंडळ योजना तर्फे नुकतेच व्याख्यानमालेचे आयोजन महाविद्यालय सभागृहात करण्यात आले असून या वेळी खानोली गावचे सुपुत्र प्रा.वैभव खानोलकर यांनी ग्रामिण युवक दशा व दिशा या विषयावर मंथक करताना स्वातंत्र्य पुर्व काळातील भारतातील स्वयं पुर्ण खेडी हे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत होते असे म्हणताना औद्योगिक करणं, शहरांची ओढ, भौतिक सुखाची अभिलाषा आणि पांढरपेशा वर्गाचे आकर्षण या गोष्टी मुळे गावाचा ऱ्हास होत गेला लोक शहरात जाऊ लागले परिणामी गाव हा तथा ग्रामीण अर्थव्यवस्थाच कोलमडली आज जर पुनश्च आपल्याला हे सावरायचे असेल तर ग्रामीण भाग स्वयं पुर्ण करायचा असेल तर या भागातील युवकांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे
आपल्या कृषी प्रधान भारत घडवायचा असेल तर कृषी सोबत अनेक जोड उद्योगातुन विविध व्यवसाय सुरू केला तर निश्चितच सकारात्मक बदल घडतील.
युवकांची व्यसनाधीन, मोबाईलचा अतिरेक, मुलीच्या लग्नासाठीच्या अपेक्षा, वाढवणारे घटस्फोटाचे प्रमाण या सारख्या विविध मुद्द्यांवर त्यांचे परखड भाष्य विद्यार्थ्यांना दिशादर्शक होतं.
या वेळी व्यासपीठावर डॉ. संजिव लिंगवत
प्राचार्य डॉ. के. जी. केळकर ,आदी प्राध्यापक डॉ, आणि मान्यवर उपस्थित होते.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
संपूर्ण राज्यात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments