Type Here to Get Search Results !

वेंगुर्ले तालुक्यातील केळुस येथील श्री तारादेवीचा वर्धापन दिन सोहळा 5 ते 7 मार्च या कालावधीत होणार साजरा

वेंगुर्ले तालुक्यातील केळुस येथील श्री तारादेवीचा वर्धापन दिन सोहळा 5 मार्च ते 7 मार्च या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

योगेश तांडेल / वेंगुर्ले 


वेंगुर्ले तालुक्यातील केळुस येथील श्री तारादेवीचा वर्धापन दिन सोहळा 5 मार्च ते 7 मार्च या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

3 दिवस चालणाऱ्या श्री तारादेवीच्या वर्धापन दिन सोहळ्यात पहिल्या दिवशी 5 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता श्री तारादेवी ,श्री भगवती, श्री ब्राह्मण, श्री घाडवस, श्री महादेव मंदिर या ठिकाणी लघु रुद्र कार्यक्रमास प्रारंभ होईल त्यानंतर 11 ते 12 या वेळेत मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक बक्षीस वितरण व सत्कार समारंभाचा कार्यक्रम होईल दुपारी आरती मंत्रपुष्पांजली झाल्यावर उपस्थित सर्वांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.
सायंकाळी चार वाजता ह भ प मकरंद देसाई यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल 7 वाजता श्री तारादेवी भगवती प्रासादिक भजन मंडळ केळुज बुवा दिप्तेश केळुस्कर , वारकरी प्रासादिक भजन मंडळ कालवीबंदर, यांचे भजनाचे कार्यक्रम झाल्यावर 9 वाजता श्री अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ आपण यांचा कुर्मदासाची वारी हा नाट्य प्रयोग सादर होईल.

दुसऱ्या दिवशी सहा मार्च रोजी सकाळी नऊ वाजता नवचंडी हवनकरुन कार्यक्रमास प्रारंभ होईल 12:30 वाजता आरती मंत्रपुष्पांजली झाल्यावर उपस्थित सर्वांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी 4 वाजता पुणे जेजुरी येथील ह भ प संदीप बुवा मांडके यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल, रात्र सात वाजता श्री भूतनाथ प्रसादिक भजन मंडळ खवणे बुवा ज्योती केळुसकर, श्री भूतनाथ प्रसादिक भजन मंडळ मालवण बुवा भालचंद्र केळुसकर यांचे भजनाचे कार्यक्रमातील त्यानंतर रात्रौ 9 वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहेत.
शेवटच्या दिवशी 7 मार्च रोजी पहाटे चार वाजता महापुरुष वारकरी भजन मंडळ निवती यांच्या काकड आरतीने कार्यक्रमास प्रारंभ होईल सकाळी नऊ वाजता नवचंडी हवन समाप्ती झाल्यावर दुपारी 12 वाजता महाआरती गावगाराणे झाल्यावर 1 वाजता उपस्थित सर्वांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.
सायंकाळी चार वाजता पुणे जेजुरी येथील ह भ प संदीप बुवा मांडके यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यावर सायंकाळी सात वाजता श्री ब्राह्मण प्रसादिक भजन मंडळ केळुस मोबार यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल.
रात्रौ 8 वाजता श्री तारादेवी भगवती महिला फुगडी ग्रुप केळुस यांचा फुगड्यांचा कार्यक्रम होईल.
रात्रौ 9 वाजता श्री लक्ष्मीनारायण भजन मंडळ वालावल बुवा सुरज लोहार यांच्या भजनाचा कार्यक्रम झाल्यावर अकरा वाजता श्री तारादेवी भगवती मातेच्या पालखीची सवाद्य मिरवणूक व फटाक्यांची आतषबाजी होईल.
रात्रौ 2 वाजता खानोलकर दशावतार नाट्य मंडळाच्या नाट्यप्रयोग सादरीकरणानंतर कार्यक्रमाची सांगता होईल.
श्री तारादेवीच्या वर्धापन दिनास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री तारादेवीच्या दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री तारादेवी सेवा समिती यांनी केले आहे.


      🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
 संपूर्ण राज्यात जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहे.

                📝📝📝📝📝
✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या तरुण तरुणींना प्राधान्य.

                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वृत्तांकन करण्याची संधी 
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments