Type Here to Get Search Results !

वेंगुर्ला नगरपरिषद आयोजित वेंगुर्ला भिंतीचित्र महोत्‍सव स्पर्धेत अक्षय जाधव प्रथम


वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत आयोजित वेंगुर्ला भिंतीचित्र महोत्‍सव स्पर्धेत अक्षय जाधव प्रथम

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले

        माझी वसुंधरा अभियान ४.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत दि. १३ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीमध्‍ये वेंगुर्ला भिंतीचित्र महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते.या स्पर्धसाठी नगरपरिषदेमार्फत सहभागी स्पर्धकांना भिंतीचित्र काढण्यासाठी भिंती White Wash करून देण्यात आल्या होत्या . तसेच स्पर्धकांना आवश्यक ते सर्व रंग नगरपरिषदेमार्फत पुरवण्यात आले होते .  या स्पर्धेसाठी नगर परिषदेमार्फत नेमून दिलेल्या अती शर्थी सह भिंती चित्र काढणे बंधनकारक होते . वेंगुर्ल्याची लोककला व संस्कृती , जैवविविधता , कलात्मक ग्राफिटी या विषयावर आधारित भींतीचित्र काढणे आवश्यक होते 
         या स्पर्धेमध्ये 10 पेक्षा अधिक चित्रकार सहभागी झाले होते. यामध्ये अक्षय जाधव याने शाडू मातीपासून आकर्षक मूर्ती बनवून पारंपरिक लोककला जपणारे मूर्तिकार , कोकणातील   स्थानिक मच्छीमार , वेंगुर्ला शहराची ओळख असलेले शून्य कचरा केंद्र इ. विषयी माहिती देणारे आकर्षक चित्र याने नगरवाचनालय येथे काढले तो प्रथम क्रमांकाच्या रक्‍कम रु. १०००० च्या पारितोषिकाचा मानकरी ठरला.

प्रणय सावंत यांने विविध प्राणी व पक्षी , वन्य जैव विविधता आणि  त्यांचे संरक्षण व संवर्धनाचा संदेश देणारे भिंतीचित्र त्याने जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा नंबर २ येथे काढले तो द्वितीय क्रमांकाच्या रक्कम रु.
७००० च्या पारितोषिकाचा मानकरी ठरला.

आदित्य गावडे ग्रुप यांनी हिंदू संस्कृती दर्शविणारे राम मंदिर ,विठ्ठल आणि वेंगुर्ला बंदर यांची चित्रे तसेच हरवलेल्या वासुदेवाची आठवण करून देणारे चित्र त्याने इंद्रधनू पार्क ,भटवाडी येथे मुख्य रस्त्यावर काढले तो 
 तृतीय क्रमांकाच्या रक्कम रु.५००० च्या पारितोषिकाचा मानकरी ठरला

 तर उत्तेजनार्थ म्हणून रोहन हळदणकर ग्रुप - वेंगुर्ला मधील विविध यात्रा, सण-उत्सव , दशावतार दर्शविणारे चित्र भटवाडी मुख्य रस्त्यावर काढले आहे . 
 विक्रांत सावंत ग्रुप - प्लॅस्टिक टाळा व समुद्रिजीवन वाचवा असा  संदेश देणारे चित्र त्याने भटवाडी मुख्य रस्त्यावर काढले आहे .
 अमृत जामदार ग्रुप -कलात्मक ग्राफिटी चे उत्तम चित्र त्याने कॅम्प येथे काढले आहे. हे तीनही ग्रुप अनुक्रमे एक हजार रुपयांच्या पारितोषकाचे मानकरी ठरले
        या महोत्सवाच्या माध्यमातून शहरातील विविध आकर्षक भिंतीचित्रांमुळे वेंगुर्ला शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडली आहे.


🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎

          🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी 
कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ,शिरोडा,बांदा, कसाल, ओरोस, येथे
 प्रतिनिधी नेमणे आहे.
                📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.
                  🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातील वृत्तांकन करण्याची संधी
                           🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922

Post a Comment

0 Comments