वेंगुर्ले उभादांडा वाघेश्वरवाडी येथील रहिवाशी सौ.दिक्षा लक्ष्मीकांत चौकेकर हिने आत्महत्या केली नसून,तिचा घातपात केला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे
नवप्रभात NEWS
वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी येथील रहिवाशी तसेच वेंगुर्ला पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सौ.दिक्षा लक्ष्मीकांत चौकेकर हिने आत्महत्या केली नसून,तिचा घातपात केला असल्याचा संशय नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.तरी वेंगुर्ले पोलीसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी तिचा भाऊ सावंतवाडी भटवाडी येथील रहिवासी तसेच माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी केला आहे.
शनिवार दि.10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास उभादांडा वाघेश्वरवाडी येथील राहत्या घराच्या गच्चीवर पिवळ्या नायलॉनच्या दोरीने सौ दिक्षा चौकेकर यांनी गळफास घेतला अशी माहिती पुढे आली. ही माहिती मिळताच सावंतवाडी येथे राहणारे तीचे भाऊ सुनील पेडणेकर व पेडणेकर कुटुंबियांनी वेंगुर्ले येथे धाव घेतली,तसेच तेथील वस्तुस्थिती बघितल्यावर तीने आत्महत्या केली.यावर पेडणेकर कुटुंबियांचा विश्वास बसला नाही.तीच्या डोक्याला भली मोठी जखम होती,तर फरशीवर पडलले रक्त गायब झाले होते, रक्त पुसलेले कपडेही गायब होते, व ज्या ठिकाणी तीने गळफास घेतला ती उंचीही खूप होती, मग तीचा हात दोरी अडकवयाला कसा पोहचला, व आत्महत्या केली तर डोक्याला जबरी घाव कसा?असा सवाल तिचा भाऊ सुनील पेडणेकर यांनी केला आहे.तसेच वेंगुर्ले पोलीसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणीही माजी नगरसेवक श्री. पेडणेकर यांनी केली आहे.
सौ.दिक्षा चौकेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलिसांकडून वेंगुर्ले येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात येत होता.परंतु या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी तज्ञ नसल्याने पेडणेकर कुटुंबीयांनी येथे शवविच्छेदन न करता कोल्हापूर येथे करावे असे सुचविले.त्यानुसार मृतदेह शनिवारी सायंकाळी कोल्हापूर येथे पाठविण्यात आला. तेथील प्राथमिक अहवालात मयत चौकेकर हिच्या डोक्याला खोल जखम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आमचा संशय बळावला आहे.पुणे येथील लॅबचा अहवाल आल्यानंतर खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे माजी नगरसेवक पेडणेकर यांनी सांगितले.दरम्यान आज रविवारी रात्री तिच्यावर वाघेश्वरवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान उद्या वेंगुर्ले पोलीस ठाण्यात ही आत्महत्या नसून घातपात असल्याची रीतसर तक्रार आपण देणार असल्याचे श्री. पेडणेकर यांनी सांगितले.
🌎🌎 नवप्रभात NEWS 🌎🌎
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🟨✒️ नवप्रभात NEWS साठी
कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ,शिरोडा,बांदा, कसाल, ओरोस, येथे
प्रतिनिधी नेमणे आहे.
📝📝📝📝📝
🟨✒️पत्रकारितेची व जनसंपर्काची आवड असलेल्या युवक युवतींना प्राधान्य.
🌐🌐🌐🌐🌐
🟨✒️संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातील वृत्तांकन करण्याची संधी
🌈🌈🌈🌈🌈
🟨✒️संपर्क 'नवप्रभात पब्लिसिटी' 9552296922
Post a Comment
0 Comments