Type Here to Get Search Results !

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात क्षयरोगग्रस्त रुग्णांसाठी आरोग्यविषयक मदत....युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाचे आयोजन

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात क्षयरोगग्रस्त रुग्णांसाठी आरोग्यविषयक मदत....युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाचे आयोजन

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले

   भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून भाजपचे युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ला शहरामध्ये क्षयरोगग्रस्त (TB) रुग्णांसाठी आरोग्यविषयक मदतीचा उपक्रम वेंगुर्ले येथील उपजिल्हा रुग्णालयात तील क्षयरोगी रुग्णांसाठी आरोग्य विषयक व साहित्य वाटप हा उपक्रम राबविण्यात आला.
   क्षयरोगामुळे अनेक रुग्णांना दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात. उपचाराच्या काळात औषधोपचार, पोषण आणि दैनंदिन गरजांचा खर्च पेलताना रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन गरजू क्षयरोगग्रस्त रुग्णांना उपचाराच्या काळात आधार मिळावा आणि त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यास हातभार लागावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
    “सेवा हीच खरी सामाजिक बांधिलकी” या भावनेतून युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या माध्यमातून हा आरोग्यविषयक मदतीचा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. समाजातील गरजू रुग्णांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या उपचाराच्या प्रवासात मदतीचा हात देण्याचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
     भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणारा हा उपक्रम केवळ वाढदिवसाचा उत्सव न राहता, समाजातील गरजू घटकांच्या आरोग्यासाठी योगदान देणारा उपक्रम ठरणार आहे. वाढदिवसाचा आनंद सामाजिक सेवेशी जोडत आरोग्य, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे.
     याप्रसंगी उपस्थित मान्यवरात भाजपाचे तालुका अध्यक्ष विष्णू उर्फ पपू परब, जिल्हा उपाध्यक्ष प - सन्ना देसाई, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक सचिन शेट्ये, सदानंद गिरप, प्रितम सावंत, सुधीर पालयेकर, नगरसेविका आकांक्षा परब, काजल कुबल, रिया केरकर, शितल आंगचेकर, भाजपा वेंगुर्ले शहर शक्ती केंद्र प्रमुख किरण कुबल, भाजपाचे पदाधिकारी मनवेल फर्नाडीस, साईप्रसाद नाईक सामाजिक कार्यकर्ते साई भोई तसेच उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आदीसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
   वेंगुर्ला शहरातील गरजू क्षयरोगग्रस्त रुग्णांना या आरोग्यविषयक मदतीचा लाभ मिळणार असून, त्यांच्या उपचाराच्या काळात आवश्यक असलेल्या बाबींमध्ये शक्य ते सहकार्य करण्यात येणार आहे. युवा नेते विशाल परब यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments