Type Here to Get Search Results !

दै.तरुण भारतचे पत्रकार महेंद्र मातोंडकर यांना पितृशोक

दै.तरुण भारतचे पत्रकार महेंद्र मातोंडकर यांना पितृशोक

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड मिरिस्तेवाडी येथील रहिवासी व दै. तरुण भारत चे पत्रकार महेंद्र मातोंडकर यांचे वडील रामचंद्र रावजी मातोंडकर (80) यांचे गोवा-बांबुळी मेडिकल कॉलेज हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असताना शनिवार 12 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास अकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, जावई, मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
    मातोंड मिरिस्तेवाडी परीसरात माडपाडवी म्हणून ते प्रसिद्ध होते. वयाच्या 80 व्या वर्षीही माडावर पारंपरिक पद्धतीने चढून नारळ काढत असत. रामा या नावाने ते होडावडा, तळवडा परिसरात प्रसिद्ध होते. मातोंड मिरिस्तेवाडी भागातील नागरिकांत त्यांच्या अकस्मित निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments