य.दि. एक स्मरण पुस्तकाचं प्रकाशन.....
महाराष्ट्राला न पटणारं य.दिंच व्यक्तिमत्व - डॉ. भालचंद्र मुणगेकर
नवप्रभातNEWS / मुंबई
महाराष्ट्राला न पटणारं असं य.दी. फडके यांचं व्यक्तिमत्व होतं,लिखाणात त्यांनी स्वतःच्या विचारांची पाऊलवाट तयार केली होती त्यांच्या कक्षा त्यांनी कधी ओलांडल्या नाहीत, अहंकाराचा लवलेश न बाळगता वस्तुस्थिती समोर ठेवून लिखाण करताना य दींनी व्यक्तिस्तोम मांडलं नाही , असं डॉ .भालचंद्र मुणगेकर म्हणाले.
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे इतिहास संशोधन मंडळ आणि अक्षर प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॅा.वासंती फडके लिखित ‘ य.दी.एक स्मरण ‘ या पुस्तकाचं प्रकाशन दादरच्या ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात शनिवारी करण्यात आलं त्यावेळी अध्यक्षपदावरून डॉ. भालचंद्र मुणगेकर बोलत होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक इतिहास संशोधक मंडळाचे दिपक पवार यांनी केलं ,
शुद्ध वैचारिक भूमिका असणाऱ्या य.दींनी ८५ पुस्तकांचं लिखाण केलं,१९ आणि े२०साव्या शतकातल्या महाराष्ट्राचं विश्लेषण करताना,त्या काळापेक्षा आताचा महाराष्ट्र वैचारिक दृष्ट्या दरिद्री झाल्याचं डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितलं ,आजच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलणंही कठीण झालं आहे ,त्याकाळात यदींनी दाखवलेलं धाडस मोठं असल्याचंही डॉ. मुणगेकर म्हणाले,
इतिहासाबद्दल लिहिताना वर्तमानाचा धागा यदींनी कधीही सोडला नसल्याचं प्रा. अरूणा पेंडसे आपल्या भाषणात म्हणाल्या तर आताच्या काळात दस्तऐवजीकरणाला महत्त्व उरलं नसल्याच्या विचारसरणीत वाढ झाली असल्याचं सांगताना कर्तव्यनिष्ठ संशोधक इतिहासकार म्हणून य.दी. यांचं स्मरण करणं खूप महत्वाचं असल्याचं संपादक गिरीश कुबेर आपल्या भाषणात सांगितलं,पुस्तकाच्या लेखिका य.दींच्या पत्नी वासंती फडके आणि त्यांचा मुलाने य. दीं.च्या अनेक आठवणी जागवल्या,या पुस्तक प्रकाशनाला सभागृहात य.दींच्या चाहत्यांची मोठ्याप्रमाणावर उपस्थित होती.
Post a Comment
0 Comments