वेंगुर्लेतील एकल महिलांनी आपली माहिती नगरपरिषदेत द्यावी.....महिला बालकल्याण सभापती गौरी मराठे यांचे आवाहन
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
महाराष्ट्र राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, कायदेविषयी, शैक्षणिक, आरोग्य विषयक व पुनर्वसनाच्या प्रश्नांचा सर्वकश स्वीकार विचार करणे आवश्यक आहे. या महिलांना विविध विभागांच्या योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देणे आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी उपाययोजना सुचविणे गरजेचे आहे. ही बाब विचारात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण चालू असून ते पूर्ण झाल्यानंतर त्याचे उचित विश्लेषण करून एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण आणले जाईल अशी घोषणा केली होती. त्या अनुषंगाने एकल महिला धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी एकल महिला मसुदा समिती गठित करण्याचे महाराष्ट्र शासनाने एकल महिला सक्षमीकरणासाठी त्या सर्व महिलांना एकत्र करून याची संपूर्ण माहिती महिला बालकल्याण विभागाला पाठविण्यात येणार आहे. यानंतर महिला बालकल्याण विभाग राज्य सरकार धोरण निश्चित करून एकल महिलांच्या सक्षमीकरण, उद्योग, व्यवसाय व शासनाच्या योजना त्यांच्यासाठी तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे वेंगुर्ला शहरातील अशा एकल महिलांनी आपली माहिती नगरपरिषदेत द्यावी व त्या ठिकाणी असलेल्या अर्ज भरून द्यावेत असे आवाहन वेंगुर्ले नगरपरिषद महिला बालकल्याण समिती सभापती गौरी मराठी यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments