सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट १ व सम्राट क्लब मये तर्फे "२०वे सम्राट संगीत सितारा स्पर्धेची पहिली प्राथमिक फेरी १० मे रोजी होणार सावंतवाडीत
नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग
समाट क्लब मये, समाट क्लब इंटरनॅशनल स्टेट यांच्या वतीने भव्य "२०वे सम्राट संगीत सितारा" या शास्त्रीय संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यास्पर्धेची पहिली प्राथमिक फेरी रविवार, दि. १० मे २०२६ रोजी सकाळी ०९.३० वा. नगरपालिका सभागृह, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा नवोदित व हौशी गायक-गायिकांना त्यांच्या कलेचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. सर्व संगीत प्रेमी व इच्छुक कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना पुढील प्रमाणे पारितोषिके ठेवण्यात आली आहेत
प्रथमः २५,०००/- व आकर्षक चषक
द्वितीय:२०,०००/- व आकर्षक चषक
तृतीयः १५,०००/- व आकर्षक चषक
तीन उत्तेजनार्थ बक्षिसेः प्रत्येकी ५,०००/-
सदर स्पर्धेसाठी सहभाग पूर्णपणे विनामूल्य असून कोणतेही प्रवेश शुल्क नाही.नोंदणी ऑनलाइन (Google Form) तसेच ऑफ लाइन पद्धतीने करता येईल. प्रत्येक केंद्रावर फक्त पहिल्या २० पात्र अर्जानाच प्रवेश दिला जाईल.
सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे वय १५ ते २५ वर्षे असणे आवश्यक असून वैध पुरावा सादरकरणे बंधन कारक आहे. ही स्पर्धा फक्त हौशी कलाकारांसाठी असून व्यावसायिक गायक अपात्र असतील.
भाषाः हिंदी / ब्रिज; स्पर्धा शास्त्रीय गायनावर आधारित आहे. प्राथमिक फेरीत निवडलेल्या चार रागां पैकी एका रागाचे १५ मिनिटांचे सादरीकरण करावे लागेल. उपांत्य व अंतिम फेरीत खयाल (१५ मिनिटे) व मध्य लय बंदिश (५ मिनिटे) सादर करावी लागेल. साथसंगत (तबला/हार्मोनियम) आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात येईल. एकूण १२ सहभागी उपांत्य फेरीसाठी निवडले जातील, त्यापैकी ६ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. मागील वर्षी प्रथम क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकास यंदा सहभाग घेता येणार नाही.
सर्व इच्छुक कलाकारांनी वेळेत नोंदणी करून या संगीतमय सोहळ्याचा भाग व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच ही प्राथमिक फेरी सर्वांसाठी खुली असून, नागरिकांनी उपस्थित राहून या नवोदित कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सम्राट नरेश 9511758836, सम्राट मंगेश 9834755178 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
Post a Comment
0 Comments