आवेरे उपरल नाईकवाडी रस्त्याचे काम तात्काळ पूर्णत्वास न आल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा...
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग यांचे मार्फत सुरू असलेल्या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यापासून रेंगाळलेले असल्याने वेंगुर्ले तालुक्यातील आवेरे उपरल नाईकवाडीतील संतप्त ग्रामस्थांनी कुडाळ येथील कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेऊन तात्काळ या रस्त्याचे काम हाती घेऊन पूर्णत्वास न आल्यास आंदोलन छेडून न्याय मागाव लागेल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी आडेली जिल्हा परिषद मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नाईक, आनंद सातार्डेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था सिंधुदुर्ग यांना सादर केलेल्या निवेदनात आवेरे उपरल नाईकवाडी या रस्त्याचे काम कार्यारंभ आदेश निघाल्यानंतर एक वर्षाने सुरु झाले. काम धिम्या गतीने सुरु होते. आणि त्यानंतर दिड महिन्यापूर्वी ठेकेदाराने, ते काम पूर्णता बंद केले. याबाबतची आम्ही ग्रामस्थ आपणास प्रत्यक्ष भेटून तोंडी कल्पना दिली. तसेच वारंवार फोन द्वारे सुध्दा आपणास कल्पना देत होतो. तरी पण आपल्या कडून कोणत्याही प्रकारचे काम सुरु करण्याबाबतची हालचाल दिसून येत नाही. रस्त्यावर सद्या ठिकठिकाणी खोदाई करुन ठेवल्यामुळे प्रवास करणे कठीण झालेले आहे. पाऊस तोंडावर असल्यामुळे खोदलेला रस्ता पूर्ण वाहून जाऊ शकतो. या रस्त्यावर सद्या लोकांचा जिवघेणा प्रवास सुरु आहे. सदर ठेकेदारास आपण त्वरित लेखी किंवा तोंडी सुचना देऊन येणा-या आठ दिवसात काम सुरु करण्याबाबत आदेश देण्यात यावेत. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल. यास आणि होणा-या रस्त्यावरील अपघातास सर्वस्वी आपणच जवाबदार रहाल. या आंदोलनाची कोणतीही पूर्व कल्पना आपल्याला देण्यात येणार नाही. हिच पूर्व कल्पना समजून त्वरित काम सुरु करण्यात यावे असे म्हटले आहे.
Post a Comment
0 Comments