Type Here to Get Search Results !

हनुमान जन्मोत्सव निमित्तहनुमान चरणी दहा हजार जोर बैठक अभिषेक संकल्प पूर्ण


हनुमान जन्मोत्सव निमित्तहनुमान चरणी दहा हजार जोर बैठक अभिषेक संकल्प पूर्ण 

नवप्रभात NEWS / वेंगुर्ला 

बजरंग बली की जय 
जय हनुमान 
जय श्री राम 
जय भवानी जय शिवाजी 
हर हर महादेव 
भारत माता की जय 
वंदे मातरम 
च्या जयघोषा त प्रति वर्षी प्रमाणे वेंगुर्ला येथील निसर्ग रम्य श्री विरासन हनुमान मंदिर गाडी अड्डा वेंगुर्ला येथे व्ययाम प्रसार अभियान व्यसन मुक्त अभियान अंतर्गत गाडी अड्डा मित्र मंडळ, विरा सन हनुमान मंदिर व्यवस्थापन श्री सातेरी व्ययाम शाळा वेंगुर्ला, युवक शरीर सौस्तव संवर्धन संस्था वेंगुर्ला,ग्रामस्थ भाविक यांच्या संयुक्त विद्यमाने व्ययाम पटू अंतर राष्ट्रीय शरीर सौस्तव पटू किशोर शांताराम सोन्सूरकर यांच्या मार्गदर्शन खाली उत्साहात पहाटे सहा ते आठ या वेळेत शक्ती देवता हनुमान चरणी एकत्रित दहा हजार जोर बैठक अभिषेक संकल्प पूर्ण करण्यात आला 
या वेळी व्ययाम पटू भाविक ग्रामस्थ स्त्री पुरुष, आदी सहभागी झाले होते प्रत्येक विद्यार्थी भाविकाने आपल्या वैयक्तिक आरोग्य कडे लक्ष द्यावे व शरीर मजबूत निरोगी बनवावे व सोबत व्यसन मुक्ती चा संदेश देत उस्पुरत सहभागत संपन्न झाला
सर्व प्रथम परंपरिक आरती झाले नंतर जोर बैठक अभिषेक ला सुरुवात झाली या वेळी वेंगुर्ला येथील वेंगा बॉईज चे सदस्य व व्ययाम पटू ग्रामस्थ यांनी सुरुवात केली. किशोर सोन्सूर कर सर यांनी उपस्तित भाविकांना व्ययामा चे महत्व सांगून वॉर्म अप कर ऊन जोर बैठक कश्या मराव्यात या बाबत मार्गदर्शन केले 
प्रत्येक व्ययाम पटू ने भाविकांनी एक तासात थांबून थांबून आपल्याला जमतील तसे जोर बैठक काढायचे आहेत व तशी नोंद करावी या प्रमाणे सर्वांनी गटागटा ने जोर बैठक काढलेत या वर्षी पुरुष सोबत महिला उपस्तिती उल्लेखनीय होती 
या वेळी शुभेच्छा देणेसाठी दैनिक तरुण भारत सिंधुदुर्ग अवृत्ती मुख्य संपादक शेखर सामंत, डॉ. राजेश्वर उबाळे डॉ. किशोर धोंड डॉ. वंदन वेंगुर्लेकर रोटरी अध्यक्ष आनंद बोवलेकरं,माझा वेंगुर्ला श्री राजन गावडे, वसंत तांडेल पत्रकार सुरेश कौलगेकर, बाळा फोवकांडे, श्री कोरगावकर श्री मयेकर, नागेश केळजी, सुहास मांजरेकर श्री केलजी मामा , नित्यानंद आठलेकरं, जेस्ट व्ययाम पटू महेश वेंगुर्लेकर, प्रकाश प्रभुखानोलकर, शिवदत्त सावंत, सौ पूनम बोवलेकरं सौ संगीता कामत प्रसाद जाधव सर सौ शिल्पा सापळे, मंडळ कार्यकर्ते पदाधिकारी आदी मान्यवर उपस्तित होते 
या प्रसंगी शेखर सामंत यांनी शक्ती देवता हनुमान चरणी जोर बैठक अभिषेक या संकल्पनेचा कौतुक करून गेली 27 वर्ष सुरु असलेला हा उपक्रम स्तुत्य आहे यासाठी सातेरी व्ययाम शाळा व गाडी अड्डा मित्रमंडळ व मंदिर व्यवस्थापन यांचे अभिनंदन केले व्ययाम प्रसार अभियान असेच पुढे चालू राहण्यास शुभेच्छा दिल्या 
कार्यक्रम यशस्वी साठी सर्व भाविक चे आभारी व्यक्त करण्यात आले

Post a Comment

0 Comments