केळुस कालीबंदर येथील नाट्य स्पर्धेत दाभोलीच्या इंद्रधनु कलामंचाचे 'मेला तो शेवटचा होता' या नाटकाने प्रथम क्रमांक पटकाविला....
नवप्रभात NEWS / वेंगुर्ला
केळुस-कालवीबंदर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात सलग २२ व्या वर्षी नवतरुण उत्साही कला क्रीडा मंडळ, विठ्ठल-रखुमाई उत्सव कमिटी व ग्रामस्थ, कालवीबंदर यांच्यातर्फे गणू बुवा पराडकर यांच्या परंपरेने चालत आलेला 'रामनवमी महोत्सव २०२६" हा गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत सामजिक नाट्य स्पर्धा संपन्न झाली.
या नाट्य स्पर्धेचे उद्घाटन जि. प. सदस्या यज्ञा साळगांवकर यांच्या हस्ते झाले. यावेळी दत्ता साळगांवकर, पुरोहित रवींद्र आरावकर, मनोहर पावसकर, नंदू तळवडकर, चंद्रकांत पाटील, विठ्ठल-रखुमाई देवस्थानचे मालक मिलींद पराडकर, विठ्ठल-रखुमाई उत्सव कमिटीचे अध्यक्ष नामदेव नागवेकर, उपाध्यक्ष गुणवंत गोखरणकर आदी उपस्थित होते.
उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे - उत्कृष्ट खी अभिनेत्री- प्रथम-वैभवी सोकट (भूमिका-गिरीजा) इंद्रधून दाभोली (मेला तो शेवटचा होता), द्वितीय- हर्षदा बागायतकर (भूमिका-सिंड्रेला) रेनबो फ्रेंड सर्कल कवठणी (आलाय मोठा शहाणा),तृतीय- पूजा राणे (भूमिका यशोदा) साई कला मंच कणकवली (बायकोशिवाय काय खरं नाही),
उत्कृष्ट अभिनेता -प्रथम-संजय नागडे (भूमिका-धुळ्या), इंद्रधनू दाभोली (मेला तो शेवटचा होता), द्वितीय- विजय कवठणकर (भूमिका - मास्तर) रेनबो फ्रेंड सर्कल कवठणी (आलाय मोठा शहाणा), तृतीय- भरत मेखी (भूमिका-डॉ. नीलकंठ) श्री देवी सातेरी कवठी (सुर राहू दे).. पार्श्वसंगीत प्रथम -मंदार आरोंदेकर (मेला तो शेवटचा होता) इंद्रधनू दामोली, द्वितीय- रोहन कुंभार (दुरितांचे तिमीर जावो) श्रींची इच्छा कलामंच तेंडोली, तृतीय शांताराम कवठणकर (रेन्बो फ्रेंड सर्कल कवठणी) आलाय मोठा शहाणा., नेपथ्य प्रथम रघुवीर कलामंच (रेनबो फ्रेंडस सर्कल कवठणी) आलाय मोठा शहाणा, द्वितीय दर्शन पराडकर व कैलास परब (शिव गौरीनंदन थिएटर नेरूर) सारे तूच वाटे, तृतीय- इंद्रधनु कलामंच दाभोली, मेला तो शेवटचा होता विजेता
उत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम - सिद्धेश सावंत (इंद्रधनू दाभोली) मेला तो शेवटचा होता, द्वितीय- सुधीर भागवत (श्रींची इच्छा कलामंच) दुरितांचे तिमीर जावो., तृतीय रामचंद्र कवठणकर (रेनबो फ्रेंड सर्कल कवठणी) आलाय मोठा शहाणा.. वैयक्तिक बक्षिसे प्रकाशयोजना-प्रथम गणेश आरोंदेकर (इंद्रधनू दामोली) मेला तो शेवटचा होता, द्वितीय- सुरेश सातार्डेकर (रेनबो कवठणी) आलाय मोठा शहाणा, तृतीय-साईराज नाईक व मनीष पाटकर (शिव गौरीनंदन थिएटर नेरूर (सारे तूच बाट)
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्तम केळुसकर, परीक्षक नंदू तळवडकर, चंद्रकांत पाटील, विठ्ठल-रखुमाई मंदिराचे मालक मिलिंद पराडकर, विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप पराडकर, नवतरूण उत्साही मंडळ कालवीबंदरचे अध्यक्ष ताम्हणकर, सचिव कृष्णा रेवणकर मुंबईचे कार्यकर्ते संदीप गोखरणकर, पुरोहित दिनेश आरावकर आदींच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. सूत्रसंचालन मंडळाचे सचिव कृष्णा रेवणकर यांनी केले.
Post a Comment
0 Comments