Type Here to Get Search Results !

रेडी येथील प्रसिद्ध गणपतीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त १८ एप्रिलला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन....


रेडी येथील प्रसिद्ध गणपतीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त १८ एप्रिलला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन....

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील प्रसिद्ध गणपती मंदिराचा ५० वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक १८ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. या सुवर्णमहोत्सवी निमित्ताने श्री सत्यविनायक महापुजेचे भव्य आयोजन करण्यात आले असून परिसरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पवित्र सोहळ्यानिमित्त श्री गजानन देवस्थान ट्रस्ट, रेडी तसेच ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविक भक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून तिर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे —
सकाळी ६.०० वाजता अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी ८.०० वाजता श्री सत्यविनायक महापूजा पार पडणार आहे. दुपारी १२.३० वाजता महाआरती होऊन १२.४५ वाजता तिर्थप्रसाद वितरित केला जाईल. दुपारी १.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत महाप्रसादाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.

याचबरोबर सायंकाळी ३.०० ते ८.०० या वेळेत स्थानिक कलाकारांकडून भजनांचा कार्यक्रम रंगणार आहे. सायंकाळी ५.०० वाजता श्री गणेश माऊली संगीत ग्रुप प्रस्तुत “स्वर गणेश” हा विशेष संगीत कार्यक्रम होणार आहे. तसेच रात्री ८.३० वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचे पारंपरिक दशावतारी नाटक सादर होणार असून, या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याला अधिकच रंगत येणार आहे.

या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने रेडी परिसरात भक्ती, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार असून, हा सोहळा भाविकांसाठी एक विशेष पर्वणी ठरणार आहे.
--------------------------------------------
🔥💧 *श्रीराम बोअरवेल – पाण्याची 100% हमी !* 💧🔥
🚰 पिण्याचे पाणी : 5,000 – 10,000 लिटर / दिवस
🌾 शेतीसाठी पाणी : 20,000 – 2,50,000 लिटर / दिवस
🔍 Ultra Modern Electric Machine Survey
✔ अचूक ठिकाणी हमखास पाणी
✔ 100% Success Rate
✔ 27 वर्षांचा अनुभव
✔ हजारो समाधानी ग्राहक
━━━━━━━━━━━━━━━━
🌞🔋 *PM सूर्यघर योजना – ₹78,000 पर्यंत सबसिडी !* 🔋🌞
💡 95% वीजबिल बचत
💡 20–25 वर्षे लाईट बिलाची चिंता नाही
🏦 On-Grid / Off-Grid सिस्टीमसाठी सोपे बँक कर्ज
⭐ श्रीराम सोलरची वैशिष्ट्ये ⭐
🔹 27 वर्षांची कार्यक्षमतेची हमी
🔹 7 वर्षे इन्व्हर्टर वॉरंटी
🔹 फॉर्मपासून सबसिडी मिळेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया आम्ही
🔹 FREE स्प्रिंकलर + 5 वर्षे FREE सर्व्हिस
🔹 3.5 – 4.5 वर्षांत गुंतवणूक वसूल
━━━━━━━━━━━━━━━━
🔋 सोलर कुठे बसवून मिळेल?
🏠 घरे | 🏨 हॉटेल्स | 🏥 हॉस्पिटल्स | 🏢 ऑफिसेस
🌱 शेती | 🏬 अपार्टमेंट्स | 🏫 नर्सरी
✔ सर्व नामांकित कंपनींचे सोलर उपलब्ध
━━━━━━━━━━━━━━━━
🟪🌞 श्रीराम सोलर & श्रीराम बोअरवेल – सावंतवाडी 🌞🟪
✨ *सिंधुदुर्गची नंबर 1 विश्वासू सेवा* ✨
💯 100% परिणामांची हमी (नियम व अटी लागू)
📞 संपर्क :
*8889998824 | 7775921004 | 9420293799 | 7588570587 | 7774851004*
 
-------------------------------------------

🏦 ✍🏼 *सिंधदुर्ग न्युज कार्यालय* ✍🏼 बाजारपेठ-दोडामार्ग, तिराळी रोड. *बातम्या व जाहिरातीसाठी 🪀9309978684 संपर्क साधा*
-------------------------------------------

Post a Comment

0 Comments