Type Here to Get Search Results !

प्रसन्ना देसाई यांचा जीवन गौरव पुरस्कार २०२६ ने सन्मान


प्रसन्ना देसाई यांचा जीवन गौरव पुरस्कार २०२६ ने सन्मान

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

  वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथील श्री देवी सातेरी वाचनालयाच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांना “जीवन गौरव पुरस्कार २०२६” प्रदान करून भव्य सन्मान करण्यात आला.
  यावेळी सातेरी वाचनालयाचे अध्यक्ष राधाकृष्ण वेतुरेकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ तसेच शिवछत्रपतींची प्रतीमा भेट देण्यात आली . यावेळी वाचनालयाचे सचिव सिद्धेश राऊळ , संचालक विवेक गोगटे , दिपक नाईक , जि.प.सदस्य विजय नाईक , वेतोरे सरपंच प्राची नाईक , पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील , शैलेश जामदार , प्रशांत नाईक इत्यादी उपस्थित होते .
    समाजकार्यातील त्यांचे दीर्घकालीन योगदान, नेतृत्वगुण आणि जनतेशी असलेला सततचा संवाद याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला.
     प्रसन्न देसाई हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सक्रिय व लोकाभिमुख नेते म्हणून ओळखले जातात. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात त्यांनी सातत्याने कार्य केले असून, गरजू नागरिकांच्या प्रश्नांवर तत्परतेने उपाययोजना करण्यासाठी ते नेहमीच पुढे असतात. विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक मदत आणि जनजागृती मोहिमा यांच्या माध्यमातून त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यांच्या कार्यपद्धतीत साधेपणा, कार्यतत्परता आणि जनतेशी असलेली जवळीक ही वैशिष्ट्ये ठळकपणे दिसून येतात. तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रेरित करणे, नव्या पिढीला समाजकार्यात सहभागी करून घेणे आणि संघटन बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे यामुळे त्यांना व्यापक लोकसमर्थन मिळाले आहे.
     या सन्मान सोहळ्यावेळी प्रसन्ना देसाई यांनी आपल्या मनोगतात हा सन्मान म्हणजे अधिक जबाबदारी असल्याचे सांगितले. समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी वाचनालयांसारख्या संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी प्रसन्ना देसाई यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या गौरवामुळे समाजसेवेच्या क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments