भुलभुलैया टीमची वालावल देवस्थानला भेट
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
रंगत संगत लक्ष्मीनारायण प्रोडक्शन निर्मित भुलभुलय्या नाटकाचा सिंधुदुर्ग दौरा सुरू असून या दौऱ्यानिमित्त आलेले सर्व कलाकार यांनी वालावल मधील श्री देव लक्ष्मी नारायण मंदिराला भेट दिली व मंदिर परिसरातील निसर्गाचे ही पाहणी केली .सामाजिक कार्यकर्ते रणजीत देसाई आणि केदार सामंत यांची रंगत संगत लक्ष्मीनारायण प्रोडक्शन तर्फे निर्मिती असून त्यांच्यातर्फे भुलभुलय्या नाटकाची निर्मिती केलेली आहे . या नाटकामधील दिग्गज कलाकार प्रिया लक्षीकांत बेर्डे . आरती सोळंकी .अमीर तडवलकर .साहिल देसाई . परिणीता पावसकर .आशुतोष घोरपडे आणि विजय सूर्यवंशी हे उपस्थित होते . तर निर्माते श्री रणजित देसाई आणि कुटुंबीय त्यांच्यासोबत होते देवस्थान कमिटीच्या वतीने सर्वांचा लक्ष्मीनारायणाची प्रतिमा . शाल . श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि कलाक्रतीस शुभेच्छा दिल्या . यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने सदस्य श्री संदीप साळसकर .व्यवस्थापक आकाश मटकर .आणि कल्पेश वालावलकर उपस्थित होते . संपूर्ण मंदिराची या कलाकारानी माहिती जाणून घेतली आणि पाहाणी केली कलाकारांच्या पुढील वाटचालीसही देवस्थानच्या वतीने संदीप साळसकर यांनी शुभेच्छा दिल्या .
Post a Comment
0 Comments