Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वायंगणी नंबर १ मध्ये किशोरवयीन मुली माता पालक महिलांसाठी घेण्यात आलेल्या समुपदेशन मार्गदर्शनाला उस्फूर्त प्रतिसाद


जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वायंगणी नंबर १ मध्ये किशोरवयीन मुली माता पालक महिलांसाठी घेण्यात आलेल्या समुपदेशन मार्गदर्शनाला उस्फूर्त प्रतिसाद

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी गावातील सर्व जि. प. शाळांच्या व्यवस्थापन समित्यांनी एकत्रित येऊन किशोरवयीन मुली माता पालक आणि महिला यांसाठी समुपदेशन मार्गदर्शन असा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.श्री राजेश्वर उबाळे स्त्रीरोग तज्ञ यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.उबाळे तसेच श्रीमती मृणाल आरोसकर जिल्हा समन्वयक राज्य तसेच जिल्हा मासिक पाळी मार्गदर्शन प्रशिक्षक, यांनी मुली व महिलांच्या समस्येवर मार्गदर्शन करतानाच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण तज्ञ श्रीमती अक्षता अवधूत नाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमास शाळा वायंगणी नंबर १ शाळा व्य. स. अध्यक्ष सुमन कामत, आवेरा नाईकवाडी शाळा व्य.स. अध्यक्ष हेमंत शेणवी, शाळा वायंगणी नंबर २ व्य.स. अध्यक्षा श्रीमती मनस्वी साळगावकर सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पोलीस पाटील श्रीमती समिधा धुरी, श्रीमती मसूरकर, महिला समूहाच्या प्रभाग स्तरीयकेडर श्रीमती विलासिनी नाईक, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर कु.भगत, आरोग्यसेविका, आशाताई, सीआरपी, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. यावेळी शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावणाऱ्या सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांचा सन्मानपत्र येऊन सन्मान करण्यात आला.व महिलांना सुरक्षा पॅड मोफत वाटण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुमन कामत, प्रवीण राजापूरकर, सुनील नाईक, ओमकार पंडित, उल्हास कामत, घनश्याम घोगळे, नारायण पेडणेकर, यांचे सहकार्य लाभले. गावातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती एकत्रित येण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालनकेंद्र शाळा वायंगणी सुरंगपाणी मुख्याध्यापिका श्रीमती शामल मांजरेकर मॅडम यांनी केले तर अक्षता नाईक मॅडम यांनीआभार मानले

Post a Comment

0 Comments