Type Here to Get Search Results !

सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक संपन्न


सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक संपन्न

नवप्रभात NEWS/ सिंधुदुर्ग

 सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा समितीच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणाचा आराखडा, सिंधुदुर्गनगरीच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य स्वागत कमान उभारण्याची योजना तसेच आधुनिक व्यापारी संकुल उभारणीचे सादरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले. या सादरीकरणावर समितीने सूक्ष्म निरीक्षण करत काही आवश्यक बदल सुचवले असून, हे बदल आठ दिवसांच्या आत पूर्ण करून सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.
 याशिवाय, प्राधिकरण क्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची दुरूस्ती व सुशोभीकरण आणि इतर विविध विकासकामे दर्जेदार पद्धतीने व निश्चित कालावधीत पूर्ण करण्यावर भर द्यावा. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता वेळेत पूर्णत्वास नेण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. 
 या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. बागुल, नगर विकास विभागाचे सहआयुक्त विनायक औंधकर, तहसीलदार चैताली सावंत, समितीचे अशासकीय सदस्य महेश उर्फ छोटू पारकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments