Type Here to Get Search Results !

पंडित दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६अंतर्गत वेंगुर्ला मंडल प्रशिक्षण वर्ग आंबोली येथे संपन्न

पंडित दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६अंतर्गत वेंगुर्ला मंडल प्रशिक्षण वर्ग आंबोली येथे संपन्न

नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग 

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले मंडलाचा निवासी प्रशिक्षण वर्ग आंबोली येथे २९ व ३० मार्च रोजी संपन्न झाला.
  यावेळी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भाजपा चे जेष्ठ नेते व वक्ते विलासजी हडकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले .
 यावेळी अभियान जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , मंडल अध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब , नगराध्यक्ष राजन गिरप , उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर , राज्य परिषद सदस्य राजु राऊळ , नगरसेवक रविंद्र शिरसाठ,  जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस ,जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ,वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे उपस्थित होते त्याच प्रमाणे या प्रशिक्षणाचे संयोजक व ता.सरचिटणीस वसंत तांडेल यांचे सहकार्य लाभले
या प्रशिक्षण वर्गास जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी इतिहास आणि विकास , विलासजी हडकर यांनी वैचारीक अधिष्ठान , महेश मांजरेकर यांनी आपल्या सरकारची कामगीरी  , श्रीकृष्ण परब यांनी सोशल मिडीया - नमो अँप - सरल अँप , गुरुनाथ उर्फ राजु राऊळ यांनी कार्यपध्दती  , संदिप गावडे यांनी बुथव्यवस्थापन व SIR , रविंद्र मडगांवकर यांनी कार्यविस्ताराची आमची दृष्टी या विषयांवर वक्ते म्हणून मार्गदर्शन केले . या प्रत्येक सत्राला अध्यक्ष म्हणून  वसंत तांडेल , सौ.सुषमा खानोलकर, राजन गिरप , प्रितेश राऊळ , लक्ष्मीकांत कर्पे , सुहास गवंडळकर , नाथा मडवळ मान्यवर लाभले व त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले वक्ता व अध्यक्ष यांचे  वेंगुर्ले - काल-आज-उदया हे पुस्तक व गुलाबपुष्प देऊन  साईप्रसाद नाईक , महादेव नाईक , विष्णू परब , मनवेल फर्नाडिस ,मयूरेश शिरोडकर, गणेश गावडे , प्रणव वायंगणकर यांनी स्वागत केले.
   या प्रशिक्षण संदर्भात रफीक शेख,सौ.आकांक्षा परब,सौ.गौरी माईणकर,सौ.रिया केरकर,समीर कांबळी , महादेव नाईक ,मयूरेश शिरोडकर , गुरुप्रसाद चव्हाण,श्रीकृष्ण धानजी , सौ.सुषमा खानोलकर यांनी आपले प्रशिक्षण वर्गातील अनुभव कथन केले.
 यावेळी वेंगुर्ले मंडलातील जिल्हा पदाधिकारी , तालुका पदाधिकारी , लोकप्रतिनिधी , शक्तिकेंद्र प्रमुख , बुथप्रमुख विविध सेलचे पदाधिकारी हे उस्फूर्तपणे सहभागी झाले या प्रशिक्षणाचे वेंगुर्ला मंडल संयोजक व उपसंयोजक म्हणून सौ.रिया केरकर व सौ.गौरी मराठे यांनी काम पाहिले . या प्रशिक्षणात एकूण ७५ प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग दर्शवला.
या प्रशिक्षणाचे सोशल मिडीया सरल अँप प्रमुख म्हणून अमेय धुरी व लक्ष्मीकांत कर्पे  यांनी काम पाहिले . या प्रशिक्षणात जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत मा.जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
  प्रशिक्षण वर्गाचे सूत्रसंचालन नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले .

Post a Comment

0 Comments