एम.आय. प्र. टी. एम (MITM) अभियांत्रिक महाविदयालयास भेट देऊन शालेय विद्यार्थ्यांचे करिअर उचीवर नेण्याकरिता वेंगुर्ले येथील श्री मानसीश्वर देवस्थान ट्रस्ट व मानसीश्वर पेट्रोलपंप यांचा अनोखा उपक्रम....
नवप्रभात NEWS / वेंगुर्ला
मुले जन्मता दुशार असतात ६ वी ७ वी इयत्तेमध्ये शिक्षण घेत असतानाच बरेचसे विदयार्थी आपली महत्वाकांक्षा ठरवित असतात. या महत्वाकाक्षेला बळ मिळावे म्हणूनच या होतकरू मुलांना अभि-यांत्रिकी विद्यालय, मेडीकल कॉलेज, सरकारी बँका इत्यादी ठिकाणी अभ्यासपूर्वक सहल आयोजीत करण्याच्या उपक्रमाचा श्रीगणेशा मानसीश्वर देवस्थान नजिकच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेपासून करण्यात आला.
दि २४ फेब्रुवारी २०२६ रोजी इयत्ता ८ वी १ ९ वी मधील विद्यार्थ्यांना तसेच ७ मार्च रोजी विद्यानिकेतन स्कूल वेंगुर्ले च्या विद्यार्थ्यांना घेऊन M.I.T.M अभियांत्रिकी महाविदयालय येथे अभ्यासपूर्वक भेट देण्यात आली. यामध्ये M.I.T. महाविद्यालयाच्या प्राचार्य, प्राध्यापक यांचे उत्तम सरकार्य लाभले. तसेच येथील संस्थापक श्री.कदम यांचे विशेष आभार उल्लेख करण्यात आला तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक श्री बोडेकर, शिक्षिका. कु. गाचती चैदवणकर यांचेही विशेष आभार मानण्यात आले सदरची कल्पना व नियोजन मानसीवर देवस्थान ट्रस्टचे विश्वत विलास कुबल यांनी यशस्वीरित्या पार पाडून सामाजिक कार्य केले आहे. असेच उपक्रम सर्व शाळांमधून करण्याचे देवस्थान ट्रस्टी यांचे ध्येय आहे असेही कुबल यांनी सांगितले सांगितले.
वेंगुर्ले येथील श्री मानसीश्वर देवस्थान ट्रस्ट व मानसीश्वर पेट्रोलपंप यांच्या या अनोख्या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांसह पालकवर्गातून त्यांचे विशेष आभार मानण्यात येत आहेत तसे या उपक्रमाचा मुलांच्या भवितव्यासाठी खऱ्या अर्थाने उपयोग होईल असे पालक वर्गासह शिक्षण प्रेमी आवर्जून सांगत आहेत.
मानसिश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विलास कुबल यांनी सर्व मुलांना स्वखर्चाने गाडीच्या व्यवस्थेसह सर्व सुविधा उपलब्ध करून देत यशस्वी नियोजन केल्याबद्दल सर्व शाळांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
Post a Comment
0 Comments