Type Here to Get Search Results !

कॉलेज मित्रांनी माझ्या पाठीवर शाल पांघरून केलेला सत्कार हा मला भविष्यात ऊर्जा देणारा -यज्ञा गोसावी-साळगावकर


कॉलेज मित्रांनी माझ्या पाठीवर शाल पांघरून केलेला सत्कार हा मला भविष्यात ऊर्जा देणारा -यज्ञा गोसावी-साळगावकर

   मनोज देसाई 
नवप्रभात NEWS 

माझ्या विद्यार्थी मित्रांच्या प्रती असलेला शिस्तीचा दृष्टिकोन व सर्वांची माया, आपुलकी, प्रेम आणि आशीर्वाद यामुळेच मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्याचे,' मत नुतन जिल्हा परिषद सदस्य पदी निवडुन आलेल्या सौ. यज्ञा गोसावी- साळगावकर यांनी व्यक्त केले.

म्हापण जिल्हा परिषद मतदार संघात शिंदे सेनेकडून विजयी झालेल्या , व १९९१-९२ बॅचच्या संत राऊळ महाराज कॉलेज ग्रुप ची मैत्रीण यज्ञा गोसावी- साळगावकर हिचा घरचा सत्कार हुमरमळा येथे करण्यात आला.

तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे सरचिटणीस श्री.राजन कोरगावकर यांचाही , शाल श्रीफळ ,पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन कॉलेज मित्रां तर्फे, यथोचित सत्कार 
वालावल हुमरमळा येथील श्री. मनोज देसाई यांच्या लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात मेधा साखळकर- राय यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न करण्यात आला. 

यावेळी त्यांचे मित्रमंडळ उमेश लुडबे ,रामजी राऊळ, अजित गोडकर ,मनीषा फणसेकर, संगीता जाधव, संगीता पडवळ- वेंगुर्लेकर ,नरेंद्र खोबरेकर ,विश्वास धुरी ,गीता चव्हाण- माधव तसेच आर्यन देसाई, रमेश पाटील व कॉलेजचे बहुतांशी विद्यार्थी मित्र उपस्थित होते.
 सत्काराला उत्तर देताना सौ. यज्ञा गोसावी साळगावकर म्हणाल्या ,'मी तुमची यज्ञा आहे- होती व तशीच राहणार आहे .माझ्या शाळा व कॉलेज मित्रांनी माझ्या पाठीवर शाल पांघरून केलेला सत्कार हा मला भविष्यात ऊर्जा देणारा असून पुढे घेऊन जाणार आहे. माझ्या विद्यार्थी मित्रांच्या ऋणात मी असेन, तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद व सहकार्यामुळेच ही वाटचाल करत आहे. मला जेव्हा केव्हा गेट-टुगेदरला यायला जमले नाही, तेव्हा मी विद्यार्थी मित्रांच्या आठवणीत रमत जाते. खरं तर माझ्या 23 वर्षाच्या शिक्षकी सेवेत माझ्या हातून होणारे समाजकार्य सेवा करत गेल्याने, मला हे सर्वांचे आशीर्वाद लाभल्याचे सौ. साळगावकर यांनी सांगितले. खरं तर मला राजकारणाकडे वळण्याचा विचार नव्हता .
परंतु आमदार केसरकर यांच्या स्विय सहाय्यकांकडून आलेली ऑफर आपण स्वीकारली आणि त्यांनी मला निवडून पण आणले. राजकारणात माझी तशी पाटी कोरीच असली, तरी शिकून घेऊन पुढे जाईन.
 आपणा सर्वांच्या सदिच्छा, परमेश्वरांचे आशीर्वाद आई-वडिलांच्या पुण्याईने हे यश संपादन करता आले.
सर्वच ज्ञात अज्ञात घटकांनी जीव ओतून यज्ञासाठी आहुती दिली. त्यांचे उपकार आयुष्यात विसरणार नसल्याचे, साळगावकर यांनी आपल्या सत्कार प्रसंगी सांगितले.

यावेळी मनिषा फणसेकर, विश्वास धुरी, मेधा साखळकर -राय ,श्री.राय ,नरेंद्र खोबरेकर, मनोज देसाई आदींनी आपली मैत्रीण यज्ञा विषयीच्या आठवणी जाग्या केल्या.

या सत्कार सोहळ्यासाठी प्रास्ताविक शिक्षक समितीचे नेते राजन कोरगावकर यांनी केले.तर सुत्रसंचलन व आभार मनोज देसाई यांनी मानले.

Post a Comment

0 Comments