Type Here to Get Search Results !

उद्या वेंगुर्ले वेतोरे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन....

उद्या वेंगुर्ले वेतोरे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन....

   योगेश तांडेल 
नवप्रभात  NEWS 

महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्रांचे निराकाण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे त्यानुसार शनिवार दिनांक 7 मार्च रोजी वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथील श्री साई योगेश्वरी मंगल कार्यालय येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळी
"छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धाडमिसे, उपविभागीय अधिकारी श्री. समीर घारे, वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी, वेतोरे मंडळ अधिकारी व वेतोरे मंडळ अंतर्गत सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments