Type Here to Get Search Results !

कुडाळ पं.स. सभापतीपदी श्री. मिलिंद नाईक‌ तर उपसभापतीपदी भाजपचे श्री. सिताराम तेली यांची बिनविरोध


कुडाळ पं.स. सभापतीपदी श्री. मिलिंद नाईक‌ तर उपसभापतीपदी भाजपचे श्री. सिताराम तेली यांची बिनविरोध

नवप्रभात NEWS  / कुडाळ 

कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेचे साळगाव पंचायत समिती सदस्य श्री.मिलिंद नाईक तर उपसभापतीपदासाठी भाजपचे झाराप मतदार संघाचे श्री. सिताराम तेली यांनी सोमवारी पंचायत समिती कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले. ठाकरे शिवसेनेने या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने ,
दोन्ही पदांसाठी महायुतीतर्फे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला होता. 
तत्पूर्वी कुडाळ येथे राजकीय हालचालींना वेग आला होता.पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. अठरा पैकी महायुतीने तेरा जागांवर यश मिळवले आहे ऊबाठाला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. 

त्यामुळे,नाईक आणि तेली यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.निवडणूक प्रक्रियेनंतर सभापती व उपसभापती पदाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
यावेळी युतीच्या नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या अर्चना घावनळकर , निखिल कांदळगावकर, बाळकृष्ण मढव,व सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. 
आता ब-याच वर्षांनी कुडाळ पंचायत समिती दालनं लोकप्रतिनिधींनी गजबजणार आहेत.

Post a Comment

0 Comments