Type Here to Get Search Results !

इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेत प्रि. एम. आर. देसाईच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश


इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेत प्रि. एम. आर. देसाईच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

नवप्रभात / वेंगुर्ला 

इंडियन टॅलेंट ओलिंपियाडतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत वेंगुर्ले येथे इयत्ता ६ वी मधील कु. शौर्य शंकर मांजरेकर हा विज्ञान विषयात राज्यात पहिला आला आहे तसेच कु. पल्लव संजय मेस्त्री याला गणित विषयात एक्सीलेंस मेडल अवॉर्ड मिळाला आहे. हे यश त्यांना अभ्यास, चिकाटी अथक परिश्रम तसेच पालकांचे व शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे प्राप्त झाले आहे. यासाठी दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मिताली होडावडेकर यांनी गुणगौरव केला आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments