Type Here to Get Search Results !

प. पू. सुवर्ण उर्फ हसरे महाराजांनी ठेवला देह..... शनिवारी १४ मार्चला सकाळी १० वाजता राणे महाराज मठ, कट्टा- मालवण येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार..


प. पू. सुवर्ण उर्फ हसरे महाराजांनी ठेवला देह..... शनिवारी १४ मार्चला सकाळी १० वाजता राणे महाराज मठ, कट्टा- मालवण येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार..


   मनोज देसाई
नवप्रभात NEWS 

  आज ( शुक्रवार १३ मार्च) प. पू. सुवर्ण उर्फ हसरे महाराज यांनी आपला देह ठेवला आहे.

  हसरे महाराज यांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने, साधेपणाने आणि अध्यात्मिक मार्गदर्शनाने कोकणातील असंख्य भक्तांच्या जीवनाला दिशा दिली. त्यांच्या हास्यमय चेहऱ्यामागे दडलेली करुणा आणि अध्यात्मिक तेज अनेकांना जीवनातील संकटांत आधार देणारे ठरले.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, गोवा आदी परिसरात त्यांच्या भक्तांचा मोठा परिवार निर्माण झाला होता. अनेकांच्या आयुष्यात त्यांनी श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित केला.
आज( शुक्रवार) ४ वा.च्या दरम्याने प. पू. सुवर्ण उर्फ हसरे महाराज यांनी देह ठेवला. आणि त्यांच्या देहत्यागाच्या वार्तेने संपूर्ण भक्तपरिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने असंख्य भक्त पोरके झाल्याची भावना व्यक्त केली.

प. पू. सुवर्ण उर्फ हसरे महाराज यांचा अंत्यसंस्कार विधी उद्या, शनिवारी. (१४ मार्च २०२६) रोजी सकाळी १०:०० वाजता (श्री राम मंदिर), प. पू. राणे महाराज मठ (कुसरवेवाडी), कट्टा,ता. मालवण येथे होणार आहे.
त्यांच्या भक्तांनी याचे नियोजन केले आहे.

Post a Comment

0 Comments