पालकमंत्री व गृह राज्यमंत्री यांच्या हस्ते पोलीस दलासाठी अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण.....
नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे नागरिकांसोबतच पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित वाटावे, यासाठी पोलिसांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेचा मजबूत आधार आहे. त्यामुळे त्यांना आधुनिक साधने आणि सुविधा देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. जिल्हा नियोजन निधीतून पोलिसांना २८ अत्याधुनिक वाहने देण्यात आली आहेत. या वाहनांमुळे गुन्हे रोखणे, तपास करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत देणे अधिक सोपे आणि जलद होणार आहे. यापुढेही पोलीस दल अधिक मजबूत करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
जिल्हा पोलीस दल अधिक सक्षम व आधुनिक बनविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पालकमंत्री नितेश राणे व गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते पोलीस दलासाठी २८ अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हा परीषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपाध्यक्ष दादा साईल, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम तसेच पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिस दल सक्षमपणे करत आहे. नागरिकांबरोबरच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कायदा व सुव्यवस्था राहिली तर जिल्ह्यात गुंतवणुक व रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन कशा प्रकारे अधिक बळकट करता येईल यासाठी पालकमंत्री म्हणून मी नेहमी प्रयत्नशील आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांना या वाहनांचा उपयोग होणार आहे. आपल्या जिल्ह्यात पर्यटकांची संख्या जासत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सीसीटीव्ही देखील पोलिस दलाला उपलब्ध करुन देण्यात येतील. 'नशामुक्त जिल्हा' अशी आपल्या जिल्ह्याची ओळख निर्माण करुन एक आदर्श जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला अग्रेसर ठेवायचे आहे असेही श्री राणे यावेळी म्हणाले. जिल्ह्याच्या सुरक्षिततेबरोबरच नागरिकांशी संवाद साधण्यासाठी जिल्हा पोलिस दल अभिनव उपक्रम राबवित आहे. पोलिस नागरिकांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
सागरी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही उपलब्ध करुन देणार
गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सागरी किनारपट्टी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, सागरी सुरक्षेला बळकटी देण्यासाठी किनारपट्टी भागात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यामुळे संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे सुलभ होऊन गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल. तसेच मच्छीमार व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठीही ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास तसेच आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्यास पोलीस यंत्रणेला मोठी मदत होणार आहे. विकासाची दूरदृष्टी लाभलेल्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाच्या कारभारामध्ये ए.आय. तंत्रज्ञानाचा समावेश करणारा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. तो नक्कीच कौतुकास्पद आहे. या उपक्रमाचे अनुकरण इतर जिल्हे नक्कीच करतील असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने पोलिस दलासाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविल्या जात आहे. यामुळे त्यांच्या घराचा प्रश्न सुटणार आहे असेही ते म्हणाले.
सिंधुदुर्ग पेालिस दलासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाणार आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयासाठी तसेच गृह प्रकल्पासाठील जागा उपलब्ध करुन दिल्यास गृह विभागातर्फे निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही ते म्हणाले.
प्रास्ताविकास पोसिल अधीक्षक डॉ. दहिकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना अडचणीच्यावेळी मदतीसाठी, वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच एखाद्या गंभिर गुन्हा घडल्यास गुन्हाच्या घटनास्थळी पोहचुन गुन्ह्याच्या घटनास्थळावरुन योग्य ते पुरावे शस्त्रीय दृष्ट्या जमा करणे, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने घटनेच्या ठिकाणी तात्काळ मनुष्य बळ पोहचविणे, जिल्ह्यातील क्युआरटी अधिकाधिक सक्षम बनविणे, न्यायालयीन बंदी, कैदी यांना कारागृहातून न्यायालयात ने आण करणे व डायल ११२ हा प्रकल्प पुर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे इत्यादी आवश्यक बाबी विचारात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यास वाहनांची आवश्यकता होती. जिल्हा पोलीस दलासाठी वाहन खरेदी करीता एकूण ३ कोटी ७४ लाख इतका निधी पालकमंत्री महोदयांच्या पुढाकारातून उपलब्ध झाला. या निधीतून २८ वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल अधिकाधिक समक्ष बनविणे तसेच डायल ११२ हा प्रकल्प अत्यंत प्रभावीपणे राबविणे, गुन्हेगारी रोखणे, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच सर्वसामान्य लोकांना आडचणींच्या वेळी या वाहनांची मोठ्या प्रमाणात मदत होणार असल्याचेही ते म्हणाले.
सिंधुदुर्ग ऑफिसर्स असोसिएशनची स्थापना
जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली 'सिंधुदुर्ग ऑफिसर्स असोसिएशन' चे गठन झाल्याबाबाबतच्या ठरावाचे प्रमाणपत्र पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्विकारले. ही असोसिएशन महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत सार्वजनिक विश्वस्त संस्था आहे. ही संस्था जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हितसंबंध जपण्यासाठी तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि कल्याणकारी उपक्रम राबविण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे.
Post a Comment
0 Comments