Type Here to Get Search Results !

दशावतार कलेतील युवा मृदुंगवादक राजेश(दादा) आकेरकर यांचा राष्ट्रीय दशावतार नाट्य संगीत कलानिधी पुरस्काराने होणार सन्मान........


दशावतार कलेतील युवा मृदुंगवादक राजेश(दादा) आकेरकर यांचा राष्ट्रीय दशावतार नाट्य संगीत कलानिधी पुरस्काराने होणार सन्मान........
     
नवप्रभात NEWS / वेंगुर्ला 

कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले - आवेरा येथील दशावतार कलेतील युवा मृदंग वादक राजेश उर्फ दादा आकेरकर यांना आर्ट्स, दुरिझम अँड कल्चर फेस्टिवल समिती - गोवा तर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय दशावतार नाट्य संगीत कला निध पुरस्कार जाहीर झाला असून रविवार 22 मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
 सुप्रसिद्ध जेष्ठ हार्मोनियम वादक प्रकाशभाई आकेरकर या आपल्या बंधुच्या पाऊलावर पाऊल ठेवुन तसेच त्यांच्या मार्गदर्शनाने तसेच दशावतार क्षेत्रातील मृदुंग सम्राट कै अशोक नेरुरकर यांचा आदर्श आजही रंगमंचावर नजरेसमोर ठेवुन दशावतार क्षेत्रात आपल्या जुन्या बाजातील मृदुंग वादनाने तसेच आजतोवर असंख्य जुन्या जाणत्या दशावतार हार्मोनियम वादकांसोबत रंगमंचावर साथसंगत करताना जुन्या दशावताराची आजही आपल्या मृदृंगवादनाने आठवण जिवंत करुन ठेवणारे युवा पिढिचे आदर्श मृदुंगवादक कु राजेश(दादा)आकेरकर यांच्या कलेची दखल घेवुन त्यांना हा महान पुरस्कार जाहीर करण्यात आला सध्या ते देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळात आपली मृदृंगवादनाची कला उत्तमरीत्या सादर करुन आपल नावलौकिक मिळवीत आहेत. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments