Type Here to Get Search Results !

बागायतदारांच्या मोर्चाला राष्ट्रीय काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा.... जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांची घोषणा..... जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन


बागायतदारांच्या मोर्चाला राष्ट्रीय काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा.... जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांची घोषणा..... जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले

राज्याच्या अर्थसंकल्पात तळकोकणातील आंबा, काजू बागायतदारांना दिलासा देणारी नुकसानभरपाई सरकारने जाहीर करणे अपेक्षित होते. पण, सरकारला कोकणातील जनतेचे काहीही पडलेले नाही. तळकोकणातील आंबा, काजू बागायतदार यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे पुन्हा एकदा पूर्णतः कोसळला आहे. तळकोकणातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना सरकारने त्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. म्हणूनच आंबा, काजू बागायतदार व व्यापारी महासंघातर्फे १२ रोजी आयोजित केलेल्या भव्य मोर्चाला राष्ट्रीय काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा आहे. संपूर्ण जिल्हयातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांनी जाहीर केले आहे.

गेली अनेक वर्षे कोकणातील आंबा व काजू बागायतदार निसर्गाच्या अवकृपेशी झगडतो आहे. बँकांची कर्जे काढून दरवर्षी महागडी किटकनाशके खरेदी करून आंबा बागायतदार आपल्या बागेची मशागत करतो. मात्र, हातातोंडाशी आलेले उत्पन्न निसर्गाच्या अवकृपेमुळे नष्ट होते. गेली अनेक वर्षे सातत्याने येथील बागायतदार नुकसानीचा सामना करत आहे. हवामानावर आधारित पिक विमा योजनेच्या निकषांमुळे अनेक बागायतदार व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागते. विमा कंपन्यांची मनमानी हा मुद्दा गेल्या काही वर्षापासून प -कर्षाने ठळक होत आहे. बागायतदार विमा हप्ता भरतो, त्यामुळे नुकसानभरपाई हा बागायतदारांचा हक्क आहे. सरकार जर बागायतदारांवर कोसळलेल्या संकटाप ती गंभीर नसेल तर लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याशिवाय पर्याय नाही. जिल्हाभरातील विविध शेतकरी संघटना आता जागृत झाल्या आहेत. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकरी मोर्चा काढत असतील तर काँग्रेस संपूर्ण शक्तीसह बागायतदार व शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा राहिल, असेही गावडे म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार तसेच संबंधित व्यापारी वर्ग सध्या अत्यंत गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, कीड-रोगांचा प्रादुर्भाव, वाढलेला उत्पादन खर्च, बाजारातील दरातील मोठी घसरण व अनिश्चितता यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोन्ही घटक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी व व्यापारी वर्गाच्या न्याय्य मागण्यांसाठी १२ मार्च रोजी सकाळी १२.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे आयोजित केलेल्या भव्य मोर्चाला जिल्हावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

बाधित आंबा व काजू बागायतदारांन बागायतदारांना तात्काळ व भरघोस नुकसान भरपाई जाहीर करावी, आंबा व काजू पिकासाठी घेतलेली सर्व कर्जे गोठवून कर्जमाफी योजनेत स्पष्ट समावेश करावा, कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांनाही पूर्ण आर्थिक मदत द्यावी, गिर्ये तालुका देवगड संशोधन केंद्र आधुनिक तंत्रज्ञानासह कार्यान्वति करून कायमस्वरूपी तज्ज्ञांची नियुक्ती करावी, औषधे व खतांच्या दरांवर नियंत्रण ठेवून बनावट कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, उसाप्रमाणे आंबा व काजू पिकांसाठी किमान हमीभाव जाहीर करून कायदेशीर संरक्षण द्यावे, आदी प्रमुख मागण्यासाठी शेतकऱ्यांचा दबावगटच उपयुक्त ठरणार आहे, असेही गावडे म्हणाले.

Post a Comment

0 Comments