मळगाव येथील कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात बुधवार ११ मार्च रोजी महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
नवप्रभात NEWS / सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात बुधवार ११ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लेखिका व मानसशास्त्रीय समुपदेशक श्रीमती कावेरी कासरलकर मयेकर उपस्थित राहून महिलांनी सवांद साधून श्रोत्यांना मार्गदर्शन करणार आहेत.सदर कार्यक्रमात श्रीमती उज्ज्वला यशवंतराव खानविलकर पटेकर पुरस्कृत कै.यशवंती धोंडू पटेकर स्मृती पुरस्काराने गावातील एका कर्तृत्ववान महिलेचा सन्मान करण्यात येणार आहे.यावर्षी सावंतवाडी येथील बालरोगतज्ज्ञ डॉ.सौ.अश्विनी मिलिंद खानोलकर यांचा प्रमुख अतिथी यांच्या हस्ते वाचन मंदिराच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे.तरी मळगाव व परिसरातील साहित्य प्रेमी वाचक व महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे.असे आवाहन वाचन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे
Post a Comment
0 Comments