Type Here to Get Search Results !

तुळस घाटीतील रस्त्यावरील मोरीची तातडीने दुरुस्तीसाठी सुजाता पडवळ यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन...


तुळस घाटीतील रस्त्यावरील मोरीची तातडीने दुरुस्तीसाठी सुजाता पडवळ यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन...

नवप्रभात NEWS  / वेंगुर्ला 

वेंगुर्ले ते सावंतवाडी रस्त्यामधील तुळस घाट
परिसरात गोवर्धन मंदिर, तुळस घाट शेजारील मोरी गेल्या दोन वर्षांपासून नादुरूस्त अवस्थेत आहे. सदर ठिकाण हे अतिशय धोकादायक वळणावर असून गेल्या महिन्याभरात येथे २ ते ३ वेळा अपघात होता होता टळले आहेत. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन, रस्त्यावरील सदर मोरीची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी तुळस जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सदस्य सुजाता पडवळ यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी येथील पूजा इंगवळे यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments