Type Here to Get Search Results !

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट सिंधुदुर्ग तर्फे 28 मार्च रोजी आंबोली येथे होणार विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान......


आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट सिंधुदुर्ग तर्फे 28 मार्च रोजी आंबोली येथे होणार विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान......

नवप्रभात NEWS /  सिंधुदुर्ग 

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट सिंधुदुर्ग ही संस्था पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहे, याचे औचित्य साधून ही संस्था सामाजिक बांधिलकी जपत सावंतवाडी तालुक्यातील, आंबोली कार्यक्षेत्रातील कार्यरत अधिकारी, सामाजिक कार्यक्षेत्र, लोक कलेतील कलाकार, पत्रकारिता या सर्वक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महनीय व्यक्तींचा सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

शनिवार दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वा. आंबोली येथील आंबोली हायस्कूलच्या सांस्कृतिक हॉलमध्ये होणाऱ्या या सत्कार समारंभ सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटचे अध्यक्ष विष्णू धोंडी चव्हाण, उपाध्यक्ष अॅड. श्री. मोहन कलराज पाटणेकर,महिला अध्यक्ष सौ.दर्शना राकेश केसरकर,सचिव राकेश किसनदास केसरकर,संचालक यशवंत बाळकृष्ण कोरगांवकर,कायदेविषयक सल्लागार अॅड. श्री. ए. ए. मकानदार यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments