वेंगुर्ला व्यापारी संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ व्यवसायिक विवेक उर्फ विभा खानोलकर यांचे निधन....
वेंगुर्ला व्यापारी संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ व्यवसायिक विवेक उर्फ विभा खानोलकर वय 65 यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज दुखःद निधन झाले.
विवेक खानोलकर यांना गोवा येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी सून नातवंडे भाऊ भावजय बहीण असा मोठा परिवार आहे.
निधनाचे वृत्त कळताच सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघ व वेंगुर्ला व्यापारी संघ यांच्याकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे वेंगुर्ले शहरासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Post a Comment
0 Comments