राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी ललितकुमार उर्फ कुमा ठाकूर यांचा आडेली पं. स. मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समीर कुडाळकर यांना पाठिंबा....
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
वेंगुर्ला तालुक्यातील आडेली पंचायत समिती मतदाोरसंघात तिरंगी लढत होत आहे. आडेली पंचायत समिती मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार जनार्दन उर्फ समीर कुडाळकर यांनी आडेली गावासह मठ गावात गेले दोन दिवस खडतर प्रचार करीत आहेत.
आडेली पंचायत समिती मतदार संघात कपबशीलाच पसंती..मतदाते करतायत कपबशीचा प्रचार...
दरम्यान आज मठ येथील राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी ललितकुमार उर्फ कुमा ठाकूर यांनी आडेली पं. स. मतदारसंघाचे (अपक्ष) उमेदवार समीर कुडाळकर यांना पाठिंबा दर्शवून ते प्रचारात सहभागी झाले आहेत. ऐनवेळी काँग्रेसच्या अपक्षाला पाठिंब्यामुळे आडेलीत एकच रंगतदार स्थिती निर्माण झाली आहे. यावेळी प्रचारात समीर कुडाळकर यांच्यासह समीर गडेकर, आडेली माजी सरपंच समिधा कुडाळकर, वैशाली कुडाळकर, आडेली माजी ग्रा. पं. सदस्य संतोष पेडणेकर, संजय धर्णे, सत्यवान कुडाळकर, प्रविणा भगत, संतोषी कुडाळकर, निलेश धुरी, सविता कुडाळकर, कल्याणी म्हापणकर, सरिता गडेकर, संतोष म्हापणकर, सावि म्हापणकर, कृष्णा राऊळ आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समीर कुडाळकर यांनी मठ गावठणवाडी पाठोपाठ मठ टाकयेवाडी, मठ कणकेवाडी भागात डोअर टू डोअर प्रचारावर भर दिल्याने आडेली, मठ भागातून आपल्याला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे समीर कुडाळकर यांनी सांगितले. दरम्यान सामाजिक कार्यात सक्रिय अशी ओळख असलेले काँग्रेसचे कुमा ठाकूर यांच्या पाठिंब्यामुळे येथील राजकीय समीकरणात निश्चितच फरक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Post a Comment
0 Comments