Type Here to Get Search Results !

नेरूर मतदार संघातून भाजप - शिवसेना युतीच्या निवडणूक प्रचाराला प्रारंभ


नेरूर मतदार संघातून भाजप - शिवसेना युतीच्या निवडणूक प्रचाराला प्रारंभ

  मनोज देसाई
नवप्रभात NEWS 

 भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतर्फे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदासाठी निवडणूक प्रचाराला सोमवारी नेरूर मतदार संघातून दिमाखात प्रारंभ करण्यात आला .

कुडाळ तालुक्यातील नेरुर या मतदारसंघात,जि.प.साठी युतीचे संजय धोंडदेव पडते ( शिवसेना),तर पंचायत समिती सदस्य पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या सौ. गुरुनाथ देसाई यांनी परिसरातील ग्रामदेवतांना कार्यकर्त्यांसह श्री फळ ठेवून प्रचाराला सुरुवात केली.व नेरुर,वालावल, हुमरमळा विभागातील मतदार संघात प्रचाराला आघाडी घेतली .

या मतदारसंघात २०१७ साली , रणजित दत्तात्रय देसाई व सौ.प्राजक्ता प्रकाश प्रभु यांनी विजय मिळवला होता.
विकास कामांच्या जोरावर जनता आपल्याला साथ देईल,असा विश्वास 
आता आठ वर्षांनंतर परत मतदार कुणाच्या पारड्यात मतं टाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 यावेळी उमेदवारांसोबत युतीचे चेंदवण येथील कार्यकर्ते देवेंद्र नाईक, अभी गावडे, सौ.नेरूरकर, हुमरमळा ग्राम पंचायत सदस्य विरेंद्र सावंत, तसेच शेखर परब, गुरुनाथ ऊर्फ लक्ष्मण देसाई, स्वानंद ऋषिकेश उपाध्ये, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments