हुमरमळा पडोस येथील राजाराम भि.परब यांचे निधन
कुडाळ तालुक्यातील हुमरमळा पडोस - ओझरवाडी येथील रहिवासी व वालावल कृषी विभाग सहकारी संघाचे विद्यमान सदस्य राजाराम भि.परब (७९) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 'राजा गावकर' या नावाने ओळखले जात होते.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही.
हुमरमळा कृषी संघाचे ते अनेक वर्षापासून सदस्य होते.
हुमरमळा गावातील देवस्थान धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग होता.
त्यांच्या पश्चात, पत्नी, मुलगा, विवाहीत मुलगी ,जावई , सुन, नातवंडे , पुतणे असा परिवार आहे. नारायणादी देवस्थान उपसमिती चे सचिव कृष्णा ऊर्फ शेखर उमाजी परब याचे ते काका होत.
Post a Comment
0 Comments