Type Here to Get Search Results !

सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समिती उपसभापती पदी प्रसाद पाटकर यांची बिनविरोध निवड


सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समिती उपसभापती पदी प्रसाद पाटकर यांची बिनविरोध निवड

नवप्रभात NEWS / सिंधुदुर्ग 

सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी परुळे गावचे सुपुत्र प्रसाद पाटकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवड प्रक्रिया सहाय्यक निबंधक श्री. मर्भळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. श्री मनीष दळवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
समितीचे सभापती मा. श्री तुळशीदास राव राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात संचालक मंडळातील अजय आकेरकर, सदानंद सर्वेकर, सुजाता देसाई, मंगेश ब्रह्मदंडे, मकरंद जोशी, आनंद ठाकूर, प्रदीप मांजरेकर, दिलीप तवटे, अशोक पराडकर, किरण रावले आदी मान्यवर उपस्थित होते.
बाजार समितीचे आर्किटेक्ट श्री योगेश सावंत हे देखील यावेळी उपस्थित होते.
निवड घोषित झाल्यानंतर श्री प्रसाद पाटकर यांनी सर्व सदस्यांचे आभार मानत शेतकरीहिताचे निर्णय, पारदर्शकता आणि काटेकोर कारभाराला प्राधान्य देण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला.
समितीतील सर्व सदस्यांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments