Type Here to Get Search Results !

वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रीय गरोदरपणातील मधुमेह (GDM) जनजागृती दिन संपन्न

वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रीय गरोदरपणातील मधुमेह (GDM) जनजागृती दिन संपन्न 

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये दिपप्रज्वलन व स्वागतानंतर रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. सौ. स्वप्नाली पवार मॅडम यांनी उपस्थित गरोदर मातांना गरोदरपणातील मधुमेह आजाराविषयी मार्गदर्शन केले. गरोदरपणातील मधुमेहामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके व त्याविषयी व त्याविषयी लवकर तपासणी व उपचार करणेविषयी मार्गदर्शन केले. यासाठी उपयुक्त असणारी GTT टेस्ट करण्याविषयी माहिती दिली.
तसेच या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदिप सावंत बालरोगतज्ञ यांनी गरोदर मातांना मधुमेह असल्यास त्यामुळे बालकांना उदभवणा-या आजारपणाविषयी मार्गदर्शन केले. यामुळे बालकांची काळजी कशी घ्यावी व संगोपन कसे करावे याबददल मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमामध्ये उपस्थित गरोदरमातांना उपस्थित मान्यवरांनी कर्करोगाविषयी माहिती दिली.
सदर कार्यक्रमाला रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी वर्ग कर्मचारी, आरोग्य सेविका, गरोदरमाता लाभार्थी व मधुमेही रुग्ण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments