वायंगणी ग्रामपंचायत येथे विविध कार्यक्रमांनी महिला दिन संपन्न
नवप्रभात NEWS / वेंगुर्ले
त्याचबरोबर वायंगणी ग्रामपंचायत कार्यालय वायंगणी येथे महिलांसाठी विषेश कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये पाककला स्पर्धा घेण्यात आली. तसेच फनीगेम स्पर्धा, खेळ पैठणीचा, नृत्य व गायन इत्यादीचा समावेश होता. पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक - सौ. रिया राहुल पेडणेकर, व्दितीय सौ. राजश्री राजेश पेडणेकर, तृतीय क्रमांक - सौ. सुवर्णा सहदेव मसुरकर व उत्तेजनार्थ १) सौ. तन्वी तानाजी धोंड, २) सौ. रश्मी राकेश पेडणेकर यांना गौरविण्यात आले. तसेच खेळ पैठणीच्या या खेळात प्रथम क्रमांक - सौ. मधुरा महेश कांबळी (पैठणी), व्दितीय क्रमांक - सौ. वर्षा यशवंत धोंड (सोन्याची नथ), तृतीय क्रमांक अक्षता आत्माराम मठकर (साडी) यांनी मिळविला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनिष दळवी साहेब, पत्रकार श्रीमती देवयानी वरसकर मॅडम, नितीन मांजरेकर, पाककलेसाठी प्रशिक्षक सौ. प्राची धुरी मॅडम तसेच होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी शुभम धुरी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक वैभव खानोलकर आणि आनंद दाभोलकर यांनी केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन हे ग्रामपंचायत वायंगणी आणि कर्मचारी वर्ग तसेच ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून झाले.
Post a Comment
0 Comments