Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वेंगुर्ल्यात विशेष तपासणी मोहिम संपन्न

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वेंगुर्ल्यात विशेष तपासणी मोहिम संपन्न 

नवप्रभात NEWS / वेंगुर्ले 

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ला नंबर एक येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम विशेष तपासणी मोहिमेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
 यामध्ये 0 ते 18 वयोगटातील मुलांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात आली सर्व शिक्षण अभियानाचे विशेषतज्ञ श्री कावळे सर श्री सरपंच सर आर बी एस के मेडिकल ऑफिसर डॉक्टर श्रेयस परब सर आणि श्री मुख्याध्यापक हरमळकर सर व सर्व शिक्षक वृंद आणि आरबीएसके कर्मचारी व अधिकारी वर्ग यांच्या सहकार्याने कार्यक्रम घेण्यात आला उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले उपस्थित विद्यार्थी व पालक व शिक्षक वृंद यांना डॉक्टर परब सर यांनी आरोग्य विषयक बहुमोल असे मार्गदर्शन केले व सिस्टर मोचेमाडकर यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळी आरोग्य व स्वच्छता याविषयी बहुमोल असे मार्गदर्शन केले औषध निर्माता नाईक मॅडमनी किरकोळ आजारांवर औषधोपचार दिले आरबीएसके कार्यक्रमांतर्गत 4 डीज अंतर्गत तपासणी करून पुढील मोफत उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी संदर्भ सेवा पुरविण्यात आली

 आरोग्य मंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या संकल्पनेतून ही विशेष मोहीम राबवली जात असून, रात्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवा जनतेपर्यंत पोहोचविणे हा मोहिमेचा उद्देश असल्याचे उप जिल्हा रुग्णालय वेंगुर्ला चे वैद्यकीय अधीक्षक डॉ संदीप सावंत यांनी सांगितले.



Post a Comment

0 Comments