Type Here to Get Search Results !

रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी हायस्कूल,तुळस च्या दोन विद्यार्थ्यांना मिळाली इन्स्पायर अवॉर्ड शिष्यवृत्ती


रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी हायस्कूल,तुळस च्या दोन विद्यार्थ्यांना मिळाली इन्स्पायर अवॉर्ड शिष्यवृत्ती

   उमेश कुंभार 
नवप्रभात NEWS 

शैक्षणिक वर्ष 2024- 25 या शैक्षणिक वर्षात भारत सरकार विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आयोजित इन्स्पायर अवॉर्ड 2024 या विज्ञान प्रतिकृती साठीच्या शिष्यवृत्ती करिता सप्टेंबर महिन्यात प्रत्येक शाळेकडून इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे नॉमिनेशन मागविण्यात येते.यामध्ये विद्यार्थ्याने कोणते मॉडेल बनविणार आहोत किंवा आपण कोणते मॉडेल बनविले आहे याची पूर्ण माहिती शाळेने वेबसाईटवर द्यायची असते.या माहितीच्या आधारे भारत सरकार मंत्रालयाकडून त्यांना योग्य वाटणाऱ्या वैज्ञानिक प्रतिकृतींची निवड करून त्या विद्यार्थ्यांना रुपये 10,000/- इतकी शिष्यवृत्ती देण्यात येते. रयत शिक्षण संस्थेच्या,श्री शिवाजी हायस्कूल तुळस या विद्यालयातील कुमारी भक्ती गोविंद भणगे (इयत्ता ७ वी) आणि कुमार गणेश अजित कुंभार (इयत्ता ९ वी) या दोन विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे. या शैक्षणिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण नऊ विद्यार्थ्यांना अशी शिष्यवृत्ती मिळाली असून त्यापैकी श्री शिवाजी हायस्कूल तुळस चे दोन विद्यार्थी आहेत.
 विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक आणि गणित ,विज्ञान शिक्षक श्री. संदीप तुळसकर सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
 इन्स्पायर अवॉर्ड शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे आणि विद्यालयाचे सर्व ग्रामस्थ , पालकवर्ग आणि शिक्षणप्रेमी यांच्याकडून कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments